<
लोहारा ता. पाचोरा ( रिपोर्टर_ ईश्वर खरे )धी शेंदुर्णी सेकं एज्यु को ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा विद्यालयाने दिनांक 15 11 2022 ते दि 22 11 2022 या कालावधीत झालेल्या विविध तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले.
यामध्ये महादेवाचे बांबरुड येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ऋषिकेश दीपक चौधरी रोहित सुरेश चौधरी कुमारी मोनाली रमेश कोळी यांनी यश मिळवले तर 17 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये कुमारी प्रिया भगतसिंग राजपूत कुमारी साक्षी अशोक क्षीरसागर कुमारी प्रियंका रमेश कोळी या चार विद्यार्थिनींनी कुस्ती स्पर्धेत यश मिळवले खो खो क्रीडा स्पर्धेत नगरदेवळा येथे झालेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला तर एम एम कॉलेज पाचोरा येथे झालेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत 14* वर्षे वयोगटा आतील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले यामध्ये 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक कुमारी संध्या गोपाल कोळी २०० मीटर धावणे प्रथम क्रमांक कुमारी संध्या गोपाळ कोळी थाळीफेक द्वितीय क्रमांक कुमारी चैतन्या नितीन क्षीरसागर लांब उडी प्रथम क्रमांक कुमारी संध्या गोपाळ कोळी थाळीफेक तृतीय क्रमांक अविनाश अर्जुन चव्हाण ज्यूदो मध्ये प्रथम क्रमांक ऋषिकेश दीपक चौधरी या खेळाडूंनी यश मिळवले तर 17 वर्षे आतील वयोगटातील खेळाडूंनीही घवघवीत यश मिळवले.
यामध्ये लांब उडी प्रथम क्रमांक रितेश गोपाल सोनवणे 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी सतीश गुनावत 400 मीटर धावणे प्रथम क्रमांक कुमारी पूर्वा दिलीप परदेशी भालाफेक प्रथम क्रमांक प्रणव शंकर सोनवणे भालाफेक प्रथम क्रमांक कुमारी प्रिया भगतसिंग राजपूत 800 मीटर धावणे द्वितीय क्रमांक कुमारी प्रिया भगतसिंग राजपूत या खेळाडूंनी यश मिळविले विजयी स्पर्धकांचे कौतुक संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड संस्थेचे सचिव आदरणीय सतीश चंद्रजी काशीद संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय सौ उज्वला ताई काशीद सहसचिव आदरणीय दिपक भाऊ गरुड वस्तीगृह सचिव आदरणीय कैलास भाऊ देशमुख विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती प्रमुख आदरणीय आबासाहेब शेळके विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पटेल दादा, सरपंच अक्षयकुमार जैस्वाल, उपसरपंच आबा चौधरी, ग्रा.पं. सदस्य अशोक माळी, ईश्वर देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अमृत चौधरी, सा.का. हिरालाल जाधव, सुरेश चौधरी, सुरेश मोरे,अर्जुन पाटील, राहुल कटारिया, धनराज गुजर, योगेश कोळी, नाना कोळी, सत्यवान खरे, पत्रकार ईश्वर खरे, दिनेश चौधरी, नाना चौधरी, महेंद्र शेळके, कृष्णराव शेळके, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विजयी स्पर्धकांच्या पालकांनी अभिनंदन केले आहे या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक आर जी बैरागी एस एस गुजर जे आर भालेराव पी एम पाटील के एम पाटील या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.