<
जळगाव – संविधान जागर समिती , जळगाव यांच्यावतीने रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ 26 नोव्हेंबर हा संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करत संविधान गौरव दिन उत्साहाने साजरा करण्यात आला .
याप्रसंगी विचार मंचावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा.ना. गुलाबराव पाटिल , महापौर सौ. जयश्री महाजन , संविधान जागर समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे , जिल्हा पोलिस अधिक्षक एम राजकुमार , महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ . विद्या गायकवाड , एजाज मलिक , शंभू पाटिल , प्रतिभा शिंदे , डी डी बच्छाव , नगरसेवक सुरेश सोनवणे , सरिता माळी , सचिन धांडे , अमोल कोल्हे , राजू मोरे , मुकुंद नन्नवरे , गनी मेमन , संदिप ढंढोरे , शालिक गायकवाड , मिलिंद पवार , रईस बागवान , दिलीप सपकाळे , महेंद्र केदार , वाल्मिक सपकाळे , रमेश सोनवणे , चंदन बिऱ्हाडे , भारती म्हस्के उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला . सर्व मान्यवरांचे स्वागत संविधान जागर समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले . त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटिल यांनी भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले . उपस्थित सर्व स्त्री पुरुष यांना प्रस्ताविकेच्या प्रिंटेड लॅमीनेशन प्रति देण्यात आल्या होत्या . गुलाबराव पाटिल यांचे नंतर सर्व नागरिकांनि प्रस्ताविकेचे सामुहिकरीत्या वाचन केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. प्रितीलाल पवार यांनी केले . मनोगत व्यक्त करतांना ना. गुलाबराव पाटिल म्हणाले की , ” सनविधानामुळेच मी तळागाळातील एक कार्यकर्ता आज महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे . संविधानाचा अभिमान सर्व भारतीयांनी ठेवावा . मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आपल्या घणाघाती भाषणात संविधानाचे महत्त्व विषद करतांना संविधानाचे संरक्षण व संवर्धन करण्याची आज नितांत आवश्यकता आहे आणि सर्व भारतीय नागरिकांनी संविधानाबाबत सदैव जागृत व सजग असावे असे आवाहन केले . तसेच प्रतिभा शिंदे , डॉ विद्या गायकवाड , शंभू सोनवणे , गनी मेमन , महापौर जयश्री महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले . त्यानंतर संविधान जागर रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यापर्यंत काढण्यात आली . सदर संविधान जागर रॅलीत मोठया संख्येने स्त्री पुरुष उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान सोनवणे , बाबुराव वाघ , मिलिंद सोनवणे , सतिश गायकवाड , भारत सोनवणे , भानुदास गायकवाड , भानुदास विसावे , आकाश सपकाळे , दिलीप त्रंबक सपकाळे , सुभाष साळुंखे , जगदीश सपकाळे , भैय्या सुरवाडे , सचिन बिऱ्हाडे , भीमराव सोनवणे , निलू इंगळे , रंजीता तायडे , नितीन सोनवणे , भिकन सोनवणे , सुनील देहाडे , विजय सुरवाडे , नितीन मोरे , आनंदा तायडे , अजय गरुड , सचिन अडकमोल , दत्तू सोनवणे , नारायण सोनवणे , कृष्णा सपकाळे , यशवंत घोडेस्वार , जिवन बहारे , योगेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले .