<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
धी शेंदुर्णी सेकं एज्यु को-ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे दि 26 11 2022 वार शनिवार रोजी भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील उपशिक्षक कविवर्य व्ही बी इंगळे सर होते सुरुवातीला कार्यक्रमांचे अध्यक्ष व विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आर एस परदेशी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ यु डी शेळके वरिष्ठ शिक्षक पी एम सुर्वे , व्ही एम शिरपूरे वाय पी वानखेडे पी यु खरे आर के सुरवाडे पी एम पाटील एस डी पाटील सोनार सर इ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते भारतीय घटना तज्ञ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी योगेश्वरी चौधरी हिने भारतीय संविधानाचे वाचन केले. व विद्यार्थ्यांनी संविधान गीत सादर केले विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक आय एस भिल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्रास्ताविकपर भाषनातून त्यांनी संविधान लिहिण्याची आवश्यकता व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर संविधान दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा लहान गट , आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मोठा गट अशा दोन गटातील स्पर्धा घेण्यात आली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपली भाषणे सादर करून भारतीय संविधानाचे महत्त्व सांगितले यामध्ये प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आल यानंतर शिक्षकांमधून व्ही एम शिरपूरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व भारतीय संविधान विषयीचे जनजागृती करण्यात आली.