<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे भारतीय संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांमध्ये भारतीय संविधान प्रस्तावना पोस्टरवर लिहून प्रदर्शन आयोजित करण्यात आले.सदरील प्रदर्शनाचे उद्घाटन माननीय नगरसेविका सौ.उज्वला ताई बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रणिता झांबरे यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व नागरिकांना असलेले हक्क, कर्तव्य, जबाबदारी, नियम ,कायदा याविषयी महत्त्व पटवून दिले.लोकशाहीच्या मुख्य आधारस्तंभ असलेल्या संविधानाचे आपण पाईक झालो पाहिजे असे आव्हान केले.व सामुहिक संविधान प्रस्तावना वाचन करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला २६/११ मुंबई येथे अतेरेकी हल्ला यामध्ये शहिद झालेल्या सैनिक, पोलिस, नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सी.बी.कोळी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.