<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-जळगाव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवाच्या” निमित्ताने “भारतीय संविधान” विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनी उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
जळगाव दि. 26.11.2022– भारतीय संविधान” विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनीला आवर्जून भेट देण्याचे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव वासीयांना केले. त्या भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-जळगाव, सामाजिक न्याय व वित्तीय सहाय्य विभाग आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत खान्देश मॉल जळगाव येथे चालणाऱ्या मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनी उद्घाटन सोहळ्यात आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अति. जिल्हाधिकारी, प्रविण महाजन, माजी महापौर, सिमाताई भोळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जळगावचे सहा. आयुक्त योगेश पाटील, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी खान्देश मॉलचे कमर्शिअल व एडमिन हेड, जयवंत धर्माधिकारी, महाप्रबंधक, तरबेज रहीम, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, केंद्रीय संचार ब्यूरो, जळगावचे निवृत्त सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, उल्हास कोल्हे, पोस्टविभाग, जळगाव के विकास अधिकारी, हेमंत ठाकूर, समाज कल्याण अधिकारी, राजेंद्र कांबळे, दिशा समाज प्रबोधन संस्था, जळगावचे अध्यक्ष, विनोद ढगे आदींची विशेष उपस्थित होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख व सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले. केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-जळगाव तर्फे पुष्पगुच्छ, संविधान पुस्तक व संविधान ट्रॉफी देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या अभियानात समाजकार्य महाविद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव शासकीय मुलींचे वसतीगृह, महिला सखी ग्रुप अश्या एकुण 1500 हजार विद्यार्थ्यानी व महिलांनी उदघाटन कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमात केंद्र शासनाच्या पंजीकृत दिशा समाज प्रबोधन बहुद्देशीय संस्था, जलगाव, समाजकार्य महाविद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव शासकीय मुलींचे वसतीगृह, महिला सखी ग्रुप तर्फे देशभक्ती पर गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात संविधान वाचन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, संविधान दिनाच्या जयघोषणानी परिसर दणाणला होता. सुरुवातीला रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून रैलीचे आयोजन करण्यात आले होते. या रैलीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगावचे 150 विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदर प्रदर्शन 26 ते 28 नोव्हेंबर, 2022 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 9 या वेळेत सर्वांसाठी विनमूल्य सुरू राहणार आहे. चित्रप्रदर्शानीच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, विविध स्पर्धा, रैली आदीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाला नागरीकांनी मोठ्या भेट देऊन भारताचे संविधान व शासनाच्या योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, जळगाव व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्यावतीने करण्यात येत आहे.