Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय संविधानाने भारतीयांना अधिकार, जबाबदारीची जाणीव करून दिली!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/11/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

नेहरू युवा केंद्र जळगाव आणि सामाजिक विज्ञान प्रशाळा क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे आयोजन

जळगाव, दि.२६ – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून संपूर्ण भारतीयांना राज्यघटना सोपवली होती. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार तर दिलेच पण सोबतच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली. भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरीकांचे मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.

संविधान दिवस निमित्त शनिवार दि.२६ रोजी नेहरू युवा केंद्र जळगाव आणि सामाजिक विज्ञान प्रशाळा क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे संविधान जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांनी केले. २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर कार्यक्रमाच्या उदघाटन सत्राला सुरुवात झाली.

नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक करताना संविधानाचे महत्व आणि नेहरू युवा केंद्राच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थितांना कार्यक्रमाच्या उदघाटक न्या.श्रीमती एस.ए.कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटना व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अजय पाटील, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी संबोधित केले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांनी संविधानाच्या तत्वांचे पालन करण्याचे सांगितले. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.उमेश गोगडीया यांनी आभार व्यक्त केले.

समारोपीय सत्रात जिल्हा सरकारी वकील स्वाती निकम यांनी मूलभूत हक्क व अधिकार यावर, ऍड.जिज्ञाली बडगुजर यांनी संविधानविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.विजय घोरपडे यांनी केले. कार्यक्रमासाठी समाजकार्य विभागाचे डॉ दीपक सोनवणे व नेहरू युवा केंद्र जळगावचे लेखाकार अजिंक्य गवळी, युवा समन्वयक तेजस पाटील, स्वयंसेवक शुभांगी फासे, मुकेश भालेराव, मनोज पाटील, रोहन अवचारे, गौरव वैद्य, हेतल पाटील, नेहा पवार आदींनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“भारतीय संविधान” विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनीला आवर्जून भेट देण्याचे आवाहन– महापौर जयश्री महाजन

Next Post

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन ….

Next Post

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन ….

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo