<
कानळदा- (ता.जळगाव)-ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय कानळदा येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.के.पी.चव्हाण सर यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव “आय.नो.संस्थेतर्फे” डॉ. सौ.निशिगंधा नेमाडे आणि डॉ.सुहास नेमाडे यांचा प्राकृतिक चिकित्सा जनजागरनांतर्गत योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी योगा शिक्षिका डॉ.नेमाडे मॅडम,श्री.सुहास नेमाडे यांनी “मोड आलेल्या धान्यांचा ”आहार याविषयीचे महत्व तसेच एक्युप्रेशर, मेडथेरपी,गिलीलपेट याविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला श्री. चंद्रकांत राणे आणि सौ.सरला राणे उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाला उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.डॉ.सौ.निशिगंधा मॅडम,डॉ.श्री.सुहास नेमाडे यांच्यातर्फे “मोड आलेल्या धान्यांचा आहार”जवळ जवळ 500 विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रार्थना,ओमकार योगाने सुरुवात करण्यात आली.संगीत शिक्षक श्री.जी.एम.सपकाळे सरांनी स्वागत गीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.एम.जे.पाटील यांनी hiकेले.कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री.आर.एन.पाटील सर,श्री.एस.एम.चव्हाण सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.