<
अमळनेर – ( प्रतिनिधी) – दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी पं.ज. ने. समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. धनदाई महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. लीलाधर पाटील यांनी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात केलेल्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी स्री शिक्षणाची कास धरली.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या जीवनातील शिक्षणाला दिलेले अनन्य महत्व, आणि सत्यशोधक समाजाची स्थापना या प्रमुख घटना विद्यार्थ्यांना उदाहरणासह सांगितल्या. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेले या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अस्मिता धनवंत सरवैया, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विजय वाघमारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्वच स्वयंसेवक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा डॉ भरत खंडागळे, प्रा.डी आर ढगे, प्रा डॉ एस आर चव्हाण, डॉ. जगदीश सोनवणे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अनिता खेडकर, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री अनिल वाणी, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक निशिगंधा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलें.