<
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-जळगाव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या” निमित्ताने “भारतीय संविधान” विषयावर मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनी सोहळा 3 दिवस उत्साहात संपन्न झाला
जळगाव – (प्रतिनिधी) – दि. 29.11.2022–भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-जळगाव, सामाजिक न्याय व वित्तीय सहाय्य विभाग आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 ते 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत खान्देश मॉल जळगाव येथे मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी महापौर जयश्री महाजन, अति. जिल्हाधिकारी, प्रविण महाजन, माजी महापौर, सिमाताई भोळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जळगावचे सहा. आयुक्त योगेश पाटील, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक, संतोष देशमुख, खान्देश मॉलचे कमर्शिअल व एडमिन हेड, जयवंत धर्माधिकारी, महाप्रबंधक, तरबेज रहीम, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार, निवृत्त सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, उल्हास कोल्हे, पोस्टविभाग, जळगाव के विकास अधिकारी, हेमंत ठाकूर, समाज कल्याण अधिकारी, राजेंद्र कांबळे, दिशा समाज प्रबोधन संस्था, जळगावचे अध्यक्ष, विनोद ढगे आदींची विशेष उपस्थित होते. पहिल्या दिवशी रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून रैलीचे आयोजन करण्यात आले होते. या रैलीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव राष्ट्रीय सेवा योजना चे 150 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या चित्रप्रदर्शनीत समाजकार्य महाविद्यालय, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव शासकीय परिचारीका महाविद्यालय शासकीय मुलींचे वसतीगृह, सुगरण सखी महिला ग्रुप, शहरातील शाळा, महाविद्यालये तसेच मॉल मध्ये येणा-या जळगाव नागरीकानी कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमात केंद्र शासनाच्या पंजीकृत दिशा समाज प्रबोधन बहुद्देशीय संस्था, जलगाव व येणा-या अनेकांनी सामूहिक संविधान वाचन व देशभक्ती पर गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
सदर प्रदर्शन 26 ते 28 नोव्हेंबर, 2022 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 9 या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य सुरू होते. चित्रप्रदर्शानीच्या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आण्णाभाऊ आर्थिक विकास महामंडळ, पोस्ट विभाग, जेष्ट नागरीक हेल्प लाइन, जिल्हा ग्रंथालय मार्फ़त अथर्व पब्लिकेशन व मतदार वोटिंग कार्ड सोबत आधार लिंक करण्याकरीता स्टाँल लावण्यात आले होते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, विविध स्पर्धा, रैली बौध्दिक सत्र आदीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदर्शनिस भेट देणा-यांनी signature campaign बोर्ड वर सह्या केल्या व दुस-या दिवशीच हा बोर्ड पूर्ण भरला होता
या चित्र प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच मोदिजींच्या कटआउट बरोबर प्रदर्शनास भेट देणा-या नागरिकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.