<
जळगाव – माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशच्या जळगाव येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष पदासाठी अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला व राज्यस्तरीय पदाधिकारी निवड समितीच्या शिफारसीनुसार अमोल कोल्हे यांच्या नावावर चर्चा करण्यात येऊन सर्वानुमते जळगाव जिल्ह्याध्यक्ष या पदासाठी अमोल कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली . माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या हस्ते अमोल कोल्हे यांना नियक्ती पत्र देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात माहिती अधिकार कायद्याचा तळागाळापर्यंत प्रचार व प्रसार करून माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची मजबूत बांधणी करणार असल्याचे अमोल कोल्हे यांनी कळविले आहे.
अमोल कोल्हे छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर उपाध्यक्ष , अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष असुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात 20 वर्षांपासून सक्रिय आहेत , सहकार्यवृत्तीने सामाजिक कार्य करणारे झुंझार कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे . सदर नियुक्ती बद्दल माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे , जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे , महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे , छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटिल , माजी महापौर नितीनभाऊ लढ्ढा , माजी महापौर ललीतभाऊ कोल्हे , प्रा.डॉ. नारायण आप्पा खडके , ऍड. गिरीश नागोरी , राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी , शिवसेनेचे महानगर अध्यक्ष शरदभाऊ तायडे , नगरसेवक सुरेश सोनवणे , माजी प्राचार्य एस एस राणे , अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप भोळे , वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे , आर पि आय आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिलभाऊ अडकमोल यांचेसह सामाजिक , राजकिय क्षेत्रातील मान्यवरांनी व राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे यांचे अभिनंदन केले आहे .