<
बांभोरी प्रचा – (प्रतिनिधी) – ग्रामपंचायत तर्फे प्रमिशांत संस्थे च्या माध्यमातून महिला बचतगटातील महिलांना सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी एक दिवसीय रोजगार प्रशिक्षण शिबिर श्री.सचिन बिऱ्हाडे, सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले शिबीर उत्साहात संपन्न झाले.
बांभोरी प्रचा चे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी ग्रामपंचायत महिलांच्या सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध राहील,तसेच बचत गटाच्या उद्योग व व्यावसाय करणेसाठी सहकार्य करण्याबाबत सांगितले, त्याचप्रमाणे बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षक सौ.ममता पाटील यांनी महिलांना स्वयंरोजगार बाबत अमूल्य मार्गदर्शन केले.
तसेच आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील व सौ.प्रीती निकम,श्री.प्रशांत पाटील यांनी महिलांच्या आरोग्य विषयक व आयुष्यमान कार्ड बाबत मार्गदर्शन केले.
त्या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी श्री.दीपक पाठक,
सौ.अश्विनी नन्नवरे-सीआरपी ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप कोळी,श्री.हिरामण नन्नवरे,श्री.जगदीश नन्नवरे,श्री.अमोल नन्नवरे,
आशा सेविका,विद्यापीठ येथील समाजकार्य विभागाचे सामाजिक कार्यकर्ते, महिला बचतगट अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.