<
समाज कल्याण विभागाच्या ‘समता पर्वास’ प्रारंभ, 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन
जळगाव- (जिमाका वृत्तसेवा) :- संविधान दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन जळगाव 26 नोव्हेंबर राज्यात सामाजिक न्याय संविधान दिन 26 नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर,2022 या कालावधीत समता पर्व साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता पर्वास आज रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगाव येथे प्रमुख व्याख्याते प्रा. शाम सोनवणे श्री. रविंद तायडे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब संघटना जळगाव बी.के तायडे, जिल्हा सचिव कास्ट्राईब संघटना जळगाव योगेश पाटील सहायक आयुक्त श्रीमती मनिषा पाटील सहा – लेखाधिकारी तसेच कार्यालयीन सर्व कर्मचारी तालुका समन्वयक समतादूत परिया उपस्थितीत संविधान प्रस्ताविकेच वाचन करण्यात आला.
तसेच 26 नोव्हेंबर संविधान दिना पासून समता पर्व’ उपक्रमास प्रभातफेरी संविधान वाचना व विविध उपक्रमाने सुरुवात करण्यात आली. शासकिय वसतिगृहातील मुला-मुलींने यांच्यावतीन सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन जळगाव ते मॉल खान्देश मिल आवार जळगाव विधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संखेने विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला होता. समाजिक न्याय भवनात सविधान प्रस्ताविका वाचनाने रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी श्रीमती जयश्री महाजन महापौर महानगरपालिका जळगाव प्रभारी जिल्हाधिकारी जळगाव प्रविण महाजन, माजी महापौर श्रीमती सिमताई भोळे, केंद्रीय संचालक ब्युरोचे व्यवस्थापक मा.श्री राजेश देशमुख क्षेत्रिय प्रचार अधिकारी प्रबुद्ध पवार व सहायक आयुक्त योगेश पाटील, श्रीमती मनिषा पाटील महाखाधिकारी, श्री. राजेंद्र काबळे कार्यालय अधिक्षक तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह वसतिगृहाचे गृहपाल, तसंच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर समता पर्व अंतर्गत दि. 27 नोव्हेंबर रोजी प्राथमिक, माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळा व महाविदयालये, सर्व शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, समाजकार्य महाविदयालये, दिव्यांग शाळा, अनुदानित वसतिगृहे, शाहू – फुले – आबेडकर निवासी – अनिवासी आश्रमशाळा केंद्रीय आश्रमशाळांमध्ये निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परीक्षा वकृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रम होणार आहे. 28 रोजी संविधाना वर व्याख्यानाच आयोजन करण्यात आले आहे. 29 नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर न्याय भवनात पत्रकारांची कार्यशाळा विषय – सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा 30 नोव्हेंबर रोजी संविधान या विषयावर भितीपत्रक, पोस्ट्रस बॅनर इत्यादी बाबत जिल्हा विभाग राज्य स्तरावर चित्रकला स्पधेचे आयोजन 1 डिसेंबर रोजी युवा गटाची कार्यशाळा, 2 डिसेंबर रोजी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीना भेटी, 3 डिसेंबर रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, 4 डिसेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांच्यासाठी कार्यशाळा, 5 डिसेबर रोजी संविधान विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समता पर्वाचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभाचे वाटप, बक्षिस वितरणाने होणार आहे असे सहाय्यक आयुक्त पलिस वितरणानं येणार आहे. समाजकल्याण जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.