<
जळगाव: बालदिन सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन जळगाव चाइल्ड लाईन तर्फे करण्यात आले होते.
वयात येताना बालविवाह, मुलींवर अत्याचार, लैंगिक शोषण, प्रेमात अडकून होणारे अत्याचार इ. अशा प्रकरणांचे प्रमाण वाढले आहेत. असे प्रकरणे लक्षात घेऊन विशेषतः मुलींसाठी वयात येताना या विषयावर विविध शाळेत जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समुपदेशक व सामाजिक कार्यकर्त्या संध्या पाटील यांनी मुलींना मार्गदर्शन केले. वाढत्या वयाबरोबर शारीरिक बदल व हार्मोन्समध्ये बदल होतो. स्वाभाविक भावनांमध्येही बदल होत जातो. झालेला हार्मोन्स बदलामुळे विरुद्ध लिंगी आकर्षण वाढते. त्यालाच बऱ्याच वेळा मुलं-मुली प्रेम समजतात. हा बदल वेळेस लक्षात आल्यास मुलं मुली भावनांच्या आहारी न जाता सावध होऊन योग्य निर्णय घेऊ शकतात.
यावेळी मुलींना पडलेले अनेक प्रश्न शंकांचे निरसन करण्यात आले. काशीबाई उखाजी कोल्हे, यादव देवचंद पाटील, माध्यमिक विद्यालय, वावडदा या शाळेत सदर कार्यक्रम घेण्यात आले.
औद्योगिक भेट
जळगाव बालगृहातील,40 मुला मुलींनी ‘औद्योगिक भेट’ या उपक्रमात अंतर्गत जळगाव येथील एस के ऑइल मिल या उद्योगास भेट दिली.
यावेळी मुला-मुलींनी उत्सुकतेने अनेक प्रश्न विचारून उद्योजकाबद्दल माहिती करून घेतली.
बालविवाह निर्मूलन. तालुक्यातील वावडदा गावात झालेल्या ग्रामसभेत समन्वयक यांनी यांनी बालविवाह निर्मलन या विषयाबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी गावामध्ये एकही बाल विवाह होणार नाही याची शपथ घेतली.
बालदिन सप्ताहात संजीवनी साळवे,रिद्धी वाडीकर, प्रसन्न बागल, कुणाल शुक्ल, निलेश चौधरी आदींनी परिश्रम घेतले