<
सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब मोहन यांचे आवाहन
जळगाव दि.1(प्रतिनिधी):केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना व्हावे मिळावे या उद्देेशाने 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब मोहन यांनी केले आहे.तसेच 7 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये सहभाग नोंदवून मागील वर्षा प्रमाणे या वर्षीही जिल्ह्याला अव्वल स्थानावर आणावे असे आवाहन केले आहे.
दुषित पाण्यामुळे विविध जलजन्य आजार पसरू शकतात त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे ही सर्व ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.त्या अनुषंगाने दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत जिल्हाभरात हे अभियान राबविण्यात येणार आहे.यामध्ये जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून त्याचे रिपोर्ट शासनाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत व जिल्ह्यातील सर्व स्रोतांचे जिओ ट्गिंग करण्यात येणार आहे.पिण्याच्या पाणी नमून्यांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असून ग्रामपंचायत स्तरावर कीट वितरीत करण्यात येणार आहे.
जिल्यातील पाण्याचे सोर्स वर्षातून एक वेळा रासायनिक तपासणी माध्यमातून करण्यात येते.या अभियान कालावधीत गावातील पाणी नमून्यांची रासायनिक तपासणी फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून गावातच करण्यात येणार आहे.या किटच्या माध्यमातून गावातील सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांची क्लोराईड, कॅल्शियम,मॅग्नेशियम,पीच,एकूण क्षारता, एकूण कठीणपणा,फ्लोराईड,नायट्रेट,आदी घटकांची तपासणी करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील आरोग्य व स्वच्छता विषयक जागरूक राहणे आवश्यक आहे.जलजन्य आजार होवू नये यासाठी दक्ष राहणे आवश्यक असून गावातील पाण्याची रासायनिक फिल्ड किटच्या माध्यमातून 1डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत स्वच्छ जल से सुरक्षा या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बाळासाहेब मोहन, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक श्री अनिकेत पाटील यांनी केले आहे.