<
न्हावी – (प्रतिनिधी ) – येथील ग्रामीण रुग्णालय न्हावी तर्फे दिनांक 01 डिसेंबर 2022 जागतिक एड्स दिवसाच्या औचित्याने कार्यक्रम व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
भारतासह अवघ्या विश्वाला एड्स रुपी अदृश्य दानवाने विळखा दिलेला असताना जनमानसात एड्स आजारा मागील कारणे, बचावात्मक उपाययोजना व आजाराची भयानकता दर्शवन्याच्या उद्देशाने न्हावी ग्रामीण रुग्णालयातर्फे आयोजित कार्यक्रमाचे फैजपूरवासीयांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक श्री वैभव लोंढे मा कार्यकारी मुख्याधिकारी नगरपरिषद फैजपूर, श्री सिद्धेश्वर आखेगावकर पोलीस निरीक्षक फैजपूर पोलीस स्टेशन, श्री एस ओ सराफ, परीवेक्षक मुन्सिपल हायस्कूल, प्राध्यापिका वंदना बोरोले पर्यवेक्षिका कनिष्ठ महाविद्यालय, फैजपूर, श्री बी डी महाले, श्री ए के महाजन, डॉक्टर कौस्तुभ तळेले वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय न्हावी, डॉ समीर सय्यद, नगरपालिका दवाखाना, श्री व्यंकटी जबडे, आरोग्य सेवक, श्री मनोज चव्हाण समुपदेशक, सौ पोर्णिमा चौधरी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रितेश ठाकूर कक्षसेवक, सागर सपकाळे, कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत, प्रा शेरसिंग पाडवी यासोबत इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जनजागृती संबंधी प्रतिज्ञा ए के महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावर्षी आपली एकता… आपली समानता एचआयव्हीसह जगणाऱ्या करिता
या ब्रीदवाक्यावर आधारलेली असून उपस्थित साऱ्यांनीच स्वतःला एड्स पासून बचाव करून एड्सग्रस्त रुग्णांसोबत सामान्य व्यवहार करण्याची प्रतिज्ञा घेतली.
या रॅलीला श्री वैभव लोंढे मुख्याधिकारी नगरपरिषद फैजपूर यांनी हिरवी झेंडी दाखवत भव्य रॅली सुभाष चौक- खुशाल भाऊ रोड – तूप गल्ली – कासार गल्ली अशी करत सुभाष चौक येथे संपन्न झाली. दरम्यान आय ई सी पत्रके घरोघरी वाटून जनजागृती करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एड्सची भयानकता या विषयावर पथ नाट्याच्या माध्यमातून जनमानसासमोर जनजागृती केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धनाजी नाना महाविद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर व ग्रामीण रुग्णालय न्हावी व नगरपालिका दवाखाना फैजपूर यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ पी आर चौधरी, श्री के टी तळेले, मुख्याध्यापक, डॉ डी एल सूर्यवंशी एन एस एस कार्यक्रम अधिकारी, श्री किशोर महाजन आरोग्य सहाय्यक, यांनी सहकार्य केले..
श्री बी डी महाले यांनी सूत्रसंचालन केले तर ए के महाजन यांनी शपथ वाचन करवून घेतले व आभार कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी मानले.