<
भडगाव (प्रतिनीधी)- येथुन जवळच असलेल्या क.ता.ह.रा.पा.कि.शि.सं.भडगाव संचलीत,गो.पु.पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथील संघाने वैयक्तिक क्रीडा प्रकारातील तालुकास्तरीय 14,17 तसेच 19 वर्षाआतील मुलांच्या मैदानी (अॕथेलेटीक्स) स्पर्धेत अनेक प्रकारात प्रथम तसेच द्वितीय येऊन महाविद्यालयास विजयश्री प्राप्त करुन दिली.
नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्षाआतील गटात रोहन राजपुत(400 मी.प्रथम), निखिल देसले (लांब उडीत प्रथम),17 वर्षाआतील गटात समीर मज्जीत मन्यार (200 मी.द्वितीय),गौरव पाटील ं(लांब उडीत द्वितीय), राहुल पाटील (भालाफेक,प्रथम),जयेश महाजन(भालाफेक द्वितीय), तसेच 19 वर्षाआतील गटात पवन पाटील (800 मी द्वितीय, 400 मी.हर्डल्स प्रथम,तिहेरी उडी प्रथम),भुषण मांडोळे(1500 मी.द्वितीय), गणेश करंकाळ (3000 मी.प्रथम),गौरव पाटील (6 कि.मी. क्राॕसकंट्री प्रथम,400 मी.हर्डल्स, 3000 मी.द्वितीय), भरत भोई(400 मी.प्रथम,भालाफेक प्रथम,हातोडाफेक द्वितीय,लांब उडी द्वितीय),प्रवीण महाजन(800 मी.तृतीय),टिनेश देसले (200 मी.द्वितीय), गुणवंत भदाणे(5 कि.मी.चालणे प्रथम,110 मी.हर्डल्स प्रथम,200 मी.तृतीय),पवन पाटील(उंच उडी द्वितीय,बांबुउडी प्रथम),मंगेश परदेशी(तिहेरी उडी द्वितीय, 5 कि.मी. चालणे द्वितीय), स्वप्निल पाटील (हातोडाफेक प्रथम, भालाफेक,थाळीफेक व गोळाफेकमध्ये द्वितीय),अजय पाटील(उंचउडी प्रथम,400 मी.द्वितीय, 6 कि.मी. क्रॉसकंट्री द्वितीय, बांबुउडी द्वितीय) तसेच यातीलच खेळाडूंनी 4×100 मी.रिले व 4×400 मी.रिलेमध्ये प्रथम स्थान प्राप्त केले आहे.ह्याप्रमाणे विविध क्रीडा प्रकारात खेळाडूंनी यश मिळवले असून त्यांची जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, आर.एस.कुंभार,राष्ट्रीय खो-खो पंच प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले,मंत्रालयीन कक्ष अधिकारी प्रशांत पाटील,जिल्हा दुध संघाच्या संचालिका पुनमताई पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक जगदीश पाटील,डॉ.कमलेश भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य आर.एस.पाटील, एस.पी. माळी,पर्यवेक्षक टी.एस. पाटील, प्रा.आर.ए. पाटील, किशोर चौधरी,मनोज पवार,अरविंद देसले, चेतन भोसले, राहुल सोनवणे आदींनी कौतुक करुन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.