<
जळगाव – (प्रतिनिधी) – मूळजी जेठा महाविद्यालयातील दिव्यांग सहाय्यता समितीने जागतिक विकलांग दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे कॅप्टन मोहन कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सं.ना. भारंबे उपस्थित होते. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे मनीष जोशी व असिफ मेमन हे सुद्धा उपस्थित होते.
दुपारच्या सत्रामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी स्टिकची कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी आकाश राठोड यांनी समन्वयक म्हणून काम बघितले. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन दिव्यांग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एस. कंची व डॉ. मनोज पांडे यांनी बघितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.समीर पाटील,प्रा. संदीप पाडवी, प्रा. ललिता निकम, संतोष मनोरे यांनी परिश्रम घेतले तसेच संजय बडगुजर,प्रवीण महाजन आणि अनिकेत देशपांडे यांनी या कार्यक्रमासाठी स्वागत गीत गायले.