<
जळगाव दि.16 – के सी ई सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम शाळेत केंद्रीय माध्यमिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या वतीने जळगाव जिल्हयात पहिल्यांदाच सीबीएससी साउथ झोन २ बोक्सिंग स्पर्धेचा आयोजन दिनांक १७ डिसेंबर २०२२ ते २० डिसेंबर २०२२ पर्यंत करण्यात आले आहे. दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ११:०० वाजता जळगाव पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते होणार असून यावेळी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यातील ३५० पेक्षा अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला के सी ई संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, संस्थेचे कोषाध्यक्ष डी टी पाटील, सदस्य हरीश मिलवाणी च शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेचं नियोजन है दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटन व १८, १९ व २० डिसेंबर २०२२ या दिवशी बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सकाळी आठ वाजेपासून दुपारी तीन व त्यानंतर सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. साऊथ झोन मधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था के सी ई सोसायटीच्या लेडीज हॉस्टेल व मुलांची व्यवस्था शाळेमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी या चार दिवशी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्याकरिता सायंकाळी कल्चरल प्रोग्राम यात विद्याथ्र्यांच्या कलागुणांसोबतच सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी याचे देखील नियोजन करण्यात आलेले आहे.
साउथ झोन मधून आलेल्या विद्यार्थ्याना खानदेश विभागात असलेल्या नामवंत संस्था, सांस्कृतिक, कला व संगीत याबद्दल देखील माहिती व्हावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी के सी ई सोसायटी संचलित विविध विभागाची जसे एकलव्य क्रीडा विभागाचे श्रीकृष्ण बेलोरकर, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे संचालक मिलन भामरे व संस्थचे इस्टेट मॅनेजर कमलाकर पाटील यांची मदत घेतली जात आहे. या पत्रकार परिषदेला सीबीएसई शाळेच्या प्राचार्य सुषमा कंची, केसीई सोसायटी कोषाध्यक्ष डी टी पाटील,मिलन वैद्य व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर व बॉक्सिंग प्रशिक्षक मिलन वैद्य हे उपस्थित होते.