<
कानळदा -(प्रतिनिधी) – ग्रामीण शिक्षण संस्था संचलित आदर्श विद्यालय कानळदा येथे भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस 22 डिसेंबर हा “गणित दिवस”म्हणून मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ शिक्षक श्री.ए. एस.चव्हाण सर,श्री.ए. आर.चौधरी सर,श्री.एम.बी.शिंदे सर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाप्रसंगी 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी गाणी,बडबड गीते,मनोगते सादर केली..मनोगतात विद्यार्थ्यांनी श्रीनिवास रामानुजन यांचे बालपण,ब्रिटिश गणिततज्ज्ञ हार्डी यांची झालेली मदत आणि रामानुजन यांची गणित या विषयातील आवड याविषयी कथन केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रस्तावना 10 वीची विद्यार्थिनी कु.कोमल सपकाळे हिने केली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणित विषय प्रमुख श्री.एच.आर.पाटील सर व इतर सर्व गणित विषयाच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले.तसेच श्री.ए. एस.चव्हाण सरांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाच्या मार्गदर्शना संदर्भात मनोगत व्यक्त केले. कुमारी कोमल सपकाळे या विद्यार्थिनींने आभारप्रदर्शन केले.