<
जळगाव – (प्रतिनिधी) – खान्देश काॅलेज एज्युकेशन सोसायटी संचालित ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण अशा कोण होणार अभ्यासार्थी? या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिक्षण म्हणजे लेखन वाचन भाषण आकडेमोड एवढेच अपेक्षित नाही तर शिक्षणाचा उपयोग जीवनात कसा करता येईल हे समजणे म्हणजे शिक्षण होय. विविध प्रकारच्या शालेय सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जीवन कसे जगायचे याविषयीचे शिक्षण मिळते असे असले तरी परीक्षेत पास होणे पहिला नंबर येणे या गोष्टी म्हणजे शिक्षण असा विचार आजही आहे किंबहुना विद्यार्थी विद्यार्थी म्हणून नाही तर परीक्षार्थी म्हणून शिकत आहे असे लक्षात येते मग त्यासाठी अभ्यास म्हणजे गाईड मधील प्रश्नांची उत्तरे पाठ करणे होय असा त्याचा अर्थ होतो
या सर्व गोष्टींचा विचार करून ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले.
उपक्रमाचे नाव कोण होणार अभ्यासार्थी?:-
या उपक्रमाची सुरुवातीला पहीली फेरी घेण्यात आली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व विषयांच्या पाठ्यपुस्तकातील पाठांची नावे, भाषा विषयातील पाठांची नावे आणि लेखकांची नावे हे एक तास वेळ देऊन लिहिण्यास सांगण्यात आले.
यातून दुसऱ्या फेरीसाठी एकूण वीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
दुसरी फेरी:-निवड झालेल्या वीस विद्यार्थ्यांचे दोन याप्रमाणे दहा गट करण्यात आले प्रत्येक गटाला प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकावर आधारित प्रश्न विचारण्यात आले जे प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित होते त्यातून पुढच्या आणि अंतिम फेरीसाठी पाच गटांची म्हणजेच दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
तिसरी आणि अंतिम फेरी:-
या फेरीत एकूण तीन राऊंड घेण्यात आले.पहील्या राऊंड मधे प्रत्येक गटाला एका बाऊल मध्ये विषयांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या त्यातून ज्या गटाने ज्या विषयाची चिठ्ठी काढली असेल त्या विषयाचा प्रश्न विचारण्यात आला.बझर राऊंड,आवड फेरी, आणि झटपट फेरी असे राऊंड घेण्यात आले . यात सर्वात जास्त गुण मिळालेल्या प्रथम तीन गटाच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित बक्षीस म्हणून देण्यात आले तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गणित इंग्रजी विज्ञानाची डिक्शनरी देण्यात आली.
सहभागी विद्यार्थी:-दोडे उत्कर्ष मनोज, कुमारी दुसाने भाग्यश्री पुरुषोत्तम, राठोड सागर विठ्ठल, कोल्हे गौरव भूषण, चैतन्य शैलेंद्र फालक, जास्वंदी संजय कुलकर्णी, कृष्णगिरी प्रमोद गिरी गोसावी, उत्कर्ष शरद देशमुख, कौशल गोपाल बारी, हेताक्षी योगेश बारी, चैतन्य निळकंठ खाचणे, पियुषा नागेश नेवे, प्रियंका प्रमोद पाटील, विजया कमलाकर सपकाळे, संस्कृती नितीन पाटील, डींपल प्रविण पाटील,नमन शाम पाटील, रितेश नितीन कदम, स्वप्निल तुषार बारी, देवेंद्र पांडुरंग पाटील.
उपक्रमाचे फायदे:-
१)विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे बारकाईने वाचन करायचे हे समजले.
२)सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असल्याने पाठ्यपुस्तकाचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले
३) यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ झाली.
४)भविष्यात स्पर्धात्मक परीक्षा साठी या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार.
कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन पर्यवेक्षक नरेंद्र पालवे, एम.एस.नेमाडे, प्रतिभा लोहार, ए.एन.पाटील, वर्षा चौधरी, व्ही. एस. गडदे, सी.बी.कोळी .रोहीणी पाटील यांनी केले.