<
साने गुरुजी मातृहृदयी होते….
ज्येष्ठ साहित्यिक भगवान भटकर
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले साने गुरुजी हे एक थोर देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी ,आदर्श शिक्षक ,उत्तम कवी,लेखक होते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी आकाशवाणी केंद्रनिदेशक भगवान भटकर यांनी केले.
समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे काव्य रत्नावली चौक येथे साने गुरुजींच्या जयंती निमित्त
त्यांच्या स्मृतीस्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.
तसेच यावेळी ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण यांनीही साने गुरुजींच्या कार्याला उजाळा दिला. साने गुरुजींचे चरित्र वाचल्यास सर्वांचे जीवन आदर्शवत व सुंदर होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कवी,साहित्यिकांसह विद्यार्थीही उपस्थित होते. याप्रसंगी कवीसंमेलनही चांगलेच रंगले.
या कवींनी सादर केल्या कविता
यावेळी कवी निवृत्तीनाथ कोळी : नमस्कार , पुष्पलता कोळी:जगणे माणसाचे,प्रकाश महाजन: लोकशाही, अशोक पारधे: हस रे माझ्या मुला, डॉ. व्ही. एस. पाटील: मातेची महती, संतोष साळवे: म्हातारे झालो तरी, शहानूर तडवी: म्हणे बदलला आहे काळ, भगवान भटकर: माणूस व्हावा दूना.
कार्यक्रमाच्या शेवटी समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी .कोळी यांनी आभार व्यक्त केले.