<
आज दि.24 डिसेंबर 2022 रोजी इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूल येथे क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष इंजि नरेश चौधरी, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपधीक्षक श्री.गणेश चौधरी जळगाव यांनी भूषविले.कार्यक्रमाला विशेष सहकार्य श्री जी.डी पाटील यांचे लाभले. कार्यक्रमाची सुरुवात मशाल पेटवून झाली. नंतर शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट चे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. कार्यक्रमांमध्ये विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नर्सरी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त उत्साह नोंदवला.
त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिल्स, पिरॅमिड, विविध खेळ यांचे सादरीकरण झाले. आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू तर नर्सरीचे विद्यार्थी होते.त्यांनी नॉवेल्टी रेसेसचे सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. संपूर्ण खेळ खेळून झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम क्रीडांगणातच पार पडला. सर्व विजय विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्व समजावून उत्तम खेळाडू होणे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात शाळेचे चेअरमन श्री. नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर नंतर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शाळेच्या प्राचार्यां परवीन खान यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षक गण, प्रमुख पाहुणे व सर्वांचे आभार मानले आणि वंदे मातरम या गीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.