<
ता. प्रतिनिधी-(राजेंद्र शेळके) – जामठी येथील रहिवासी अशोक काशिनाथ सत्रे ह. मु. रांजणी यांची शेत जमीन जामठी शिवारात गट क्र.५१ असून त्यामधील विनापरवानगी वृक्षतोड करण्यात आली अशी तक्रार चेतन तायडे राहणार अहमदगाव तालुका बोदवड यांनी दि.२२/१२/२२ रोजी मुक्ताईनगर वन विभाग कार्यालयात दिली होती. परंतु अद्यापही वनविभागाने दखल न घेतल्यामुळे पुन्हा २७/१२/२२ ला स्मरणपत्र चेतन तायडे यांच्याकडून देण्यात आले.
दरम्यान जामठी येथील पाणलोट, नाला, व ग्राम.पं. हद्दीच्या क्षेत्रातील वृक्षतोड करण्याबाबत वनविभागाचे वणपाल अधिकारी उमाकांत कोळी यांना अमोल तायडे यांनी अवैध वृक्ष तोडणे बाबत विचारणा केली असता अधिकारी कोळी यांनी अगोदर उडवा उडवीची उत्तरे दिली चेतन तायडे यांनी जामठी येथे घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केली असता फक्त ९० झाडांची तोडणी करण्याची परवानगी दिली असल्याचे समजले परंतु ९०पेक्षा जास्त वृक्ष तोडल्याचे आढळून आले. त्यात आरायाचे झाड,गोंधळ, बोरीचे झाडं, कडुलिंबाचे झाडे, इत्यादी तोडलेली झाडे आढळून आली.
तरी संबंधित संपूर्ण झाडांची पाहणी करून तसेच परवानगी मध्ये दिलेले झाडे सध्या स्थितीतील तोडलेली झाडे यात तफावत आढळून आलेली आहे. तरी आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून संबंधित वृक्षतोड करणारे संजय कापडे राहणार जामनेर शेख बुडन शेख फकीरा राहणार वाघारी तालुका जामनेर तसेच संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर दिनांक २९/१२/२२ला अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वन विभाग अधिकारी व कर्मचारी यांना चेतन तायडे यांच्याकडून देण्यात आला.