<
निंभोरा ब्रु ||-(दीपनगर )-भुसावळ तालुक्यातील निंभोरा ब्रु येथे आज जळगाव जिल्हा ग्राहक आयोग यांचे तर्फे ग्राहक जनजागृती अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय पिंप्रीसेकम निभोरा ब्रु.|| (दिपनगर) , ता.भुसावळ जि.जळगाव येथे सपन्न झाले.
सदर कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन जळगाव जिल्हा ग्राहक आयोगाचे प्रभारी अध्यक्षा श्रीमती पूनम मलिक हया कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी होत्या त्यांनी ग्राहक न्यायालयाचे महत्व समजून सांगितले ऍडव्होकेटं ज्योती भोळे यांनी ग्राहकांचे ऑनलाईन फसवणूक कशी होते आणि त्यावर तर दाद कशी व कुठे मागावी. ग्राहकांचे हक्क व अधिकार बद्दल माहिती दिली तर वकील संघांचे अध्यक्ष ऍडव्होकेट हेमंत भंगाळे यांनी शेतकार्यांची बी -बियाणे खरेदी करताना घ्यावयाची दक्षता व विमा कंपनीने फसवणूक केली तर काय करावे.तसेच ग्राहकनी वस्तू घेताना बिल प्रत्येक वेळेला घेणे किती आवश्यक आहे या बद्दल माहिती दिली. दीपनगरचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी ग्राहक मंच च्या पूर्ण टीम चे कौतुक केले.तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रकाश वानखेडे , जिल्हा ग्राहक मंचचे सदस्य सुरेश जाधव,वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार, सरपंच रोहिणी कोलते, ग्रामपंचायतसदस्य , उल्हास बोरोले व यासिनखा पठाण, विजय तायडे, विजय मालवीय, कुणाल सुरळकर, ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, प्रकाश तायडे,फेकरीचे माजी सरपंच राहुल वाघ,शेख शब्बीर इंजिनिअर,नासीर मेमन, सुधीर बेंडाळे तसेच ग्राहक तक्रार निवारण आयोग वकील संघाचे अध्यक्ष ॲड.श्री. हेमंत भंगाळे त्याचप्रमाणे प्रबंधक कैलास बैरागी, पत्रकार राजेश निकम ,जिल्हा ग्राहक आयोगाचे सर्व कर्मचारी, उपस्थित होते.कार्यक्रमात छोट्या माहिती पुस्तकीचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अडोव्होकेट यांनी केले तर जिल्हा ग्राहक मंच तर्फे कैलास बैरागी यांनी तर गावात कार्यक्रम घेऊन खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे यांनी आभार मानले.
कार्यक्रममूळे गावातील नागरिकांना मध्ये विशेष उत्साह दिसून आला तर काहींनी काही प्रश्न उपस्थित केले त्यावेळी फेकरी गावचे माजी सरपंच राहुल वाघ यांनी प्रत्येक गाव व तालुका पातळीवर ग्राहक तक्रार निवारण समिती असावी अशी मागणी केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गावातील नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.