<
जळगाव दि.7 -के सी ई चे आय एम आर येथे सायबर क्राईम वर कार्यशाळा घेण्यात आली. त्यात प्रमुख वक्ते डी एस आय दिगंबर थोरात आणि दिलीप चिंचोले यांचे स्वागत आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शमा सराफ यांनी केले. याप्रसंगी प्रस्तावना करतांना प्रा शिल्पा बेंडाळे यांनी वाढत्या आॅनलाईन फ्राॅड संबधी तसेच सेक्सटोर्शनच्या गुन्हयासंबधी चिंता व्यक्त करीत विद्यार्थ्यांना सजग राहाण्याचा सल्ला दिला.
या प्रसंगी बोलतांना प्रमुख वक्ते श्री दिगंबर थोरात यांनी सांगितले की, इंन्टा फेसबुक, वाॅट्स अप वापरताना कशी काळजी घ्यावी, त्यासाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन कसे करावे, प्रोफाईल कायम लाॅक ठेवावी, अनोळखी मित्र बनवू नका, सेक्टाॅर्शन मोठ्या प्रमाणात आज राजस्थान आणि झारखंड या राज्यांमधून होत आहे. वीज बिलाची रक्कम भरा हे फ्राॅड जळगावात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऐनी डेस्क, डार्क वेवसारखे स्क्रीन शेअरीग अॅप्लिकेशन वापरून तुमचा डाटा हॅक होऊ शकतो. लोन अॅप्लिकेशनचे गुन्हे वाढता आहेत. लोन ऑनलाईन लगेच मंजूर होते. पण तिथेही तुमचे कागदपत्रे आणि फोटोवरून तुमचे ब्लॅकमेलिंग सुरु होते. तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे सुध्दा तुम्ही चेक केले पाहिजे हे त्यांनी सांगितले.
त्यानंतर बोलताना दिलीप चिंचोले म्हणालेत, “तुमचा लाॅग किमान एक वर्षाचा पोलिसांना उपलब्ध होऊ शकतो. सिरीयस केस असेल तर तीन वर्षांचा सुध्दा उपलब्ध होऊ शकतो. आय टी कायदा नीट समजून घ्या आणि नको त्या गुन्ह्यांमध्ये नकळतपणे अडकू नका. ज्या अॅप्लिकेशनची गरज नसेल ते इन्टाॅल करूच नका. कामापुरते इन्टाॅल करुन नंतर डिलीट करा. स्पा अॅप इन्टाॅल होऊ देऊ नका. जाॅब देणार्या वेब साईट वर प्रोफाइल अपलोड करतांना सुध्दा ती साईट जेन्युअन आहे की नाही हे समजावुन घ्या. जाॅब मिळणार म्हणुन पैसे कधीही पेड करु नका असे कधीही होत नाही. आॅनलाईन वस्तु घेतांना डिलेव्हरी बाॅयबरोबर व्हिडीयो काढुन घ्या. ओएलेक्स वरचे फ्राॅड लक्षात घ्या. आॅनलाईन सेकंड हॅन्ड वस्तू घेतांना विषेश काळजी घ्या. शेअर ट्रेडिंगमध्ये करोडोंत फसवणुक होत आहे. वेवसाईट कधी लाॅन्च केली आहे, होस्ट केली आहे, हे चेक करा. तुम्ही आॅनलाईन जुगार खेळत असाल तर सावध व्हा. मोहाला बळी ना पडता.. अवेअर रहा फुकटचे पैसे मिळवण्याच्या मोहात पडु नका. आॅनलाईन कुणी पैसे देत असेल तर त्याला पैसे कॅश करुन देऊ नका. आपला मोबाईल कुणाच्याही हातात देऊ नका. पुढे त्यांनी पाॅलीसी फ्राॅड ओएलेक्स फ्राॅड, डेटा एन्ट्री फ्राॅड विषयी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना अतिशय माहितीपूर्ण उत्तरे दिलीत
सायबरमध्ये करीयर करण्यासाठी सुध्दा भरपुर संधी आहेत. त्याविषयी सुध्दा श्री चिंचोले यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. आभार प्रा शमा सराफ यांनी मानले.