Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/01/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
विजय जैन यांच्या “प्लास्टिक प्रदूषण” विषयावरील पोस्टर ला राज्य शासनाचा पुरस्कार!

मुंबई दि.10 प्रतिनिधी – जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार श्री. विजय जैन यांच्या प्लास्टिक प्रदूषण विषयाचे गांभीर्य अधोरेखित करत, घराबाहेर पडताना आपली कापडी पिशवी सोबत बाळगण्याची आठवण करून देणाऱ्या लक्षवेधी पोस्टर रचनेला महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या ६२ व्या वार्षिक प्रदर्शनात ५० ००० (रुपये पन्नास हजार) चे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

प्रधान सचिव श्री विकासचंद्र रस्तोगी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, प्रा प्रमोद रामटेके, अमूर्त चित्रकार, नागपूर, श्री. राजीव मिश्रा, कला संचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई येथे दि १० जानेवारी २०२३ रोजी सायं ५.३० वा. प्रसिध्द छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते जैन यांना गौरविण्यात आले. उपयोजित कलेच्या सदर पोस्टरसह विजय जैन यांच्या रेखा व रंगकला विभागात “रंगलीपी” ही जलरंग चित्र मालिका देखील या वार्षिक कला प्रदर्शनाचा भाग आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत ११ ते १६ दरम्यान सर्वांसाठी खुले असणार आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी प्लास्टिक कचऱ्यासारख्या ज्वलंत सामाजिक विषयाला साध्या सोप्या रुपात मांडल्याचे सांगत श्री विजय जैन उपयोजित कलेबरोबर रेखा व रंगकलेमध्ये देखील आपले योगदान सातत्याने देत असल्याबद्दल यांचे कौतुक केले आहे. नुकताच “पुरुषी अहंकार” या विषयावरच्या त्यांच्या पोस्टरला मुंबईच्या “डूडल सोशल ॲड फेस्ट” या राष्ट्रीय स्पर्धत नामांकन मिळाले आहे.

सदर स्पर्धेचे ते २०१७ चे विजेते आहेत. विजय जैन यांच्या “स्त्री शिक्षणा”च्या पोस्टर ला उत्तर प्रदेश ललित कला अकादमी चा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छ भारत, प्रौढ शिक्षण, झाडं वाचवा, बाल कामगार, सकस आहार- विद्यार्थी, सोशल मीडिया वापर: एक जबाबदारी आणि कोरोना काळातील मास्क वापरासाठी उद्युक्त करणारी सोशल मीडिया मालिका अशा सामाजिक विषयाला धरून त्यांनी अतिशय कल्पक आणि प्रबोधनात्मक पोस्टर रचना साकारल्या आहेत. त्यांच्या या कामाचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या वतीने ११ आणि १२ जानेवारीला शिबिराचे आयोजन

Next Post

अल्पसंख्याक विकासविषयक विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या विविध विभागांना सूचना – राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य कुमारी सय्यद शहजादी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d