<
जळगाव – (प्रतिनिधी) – “आज रोजी मा. कुलगुरू वी.एल माहेश्वरी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांची “मासू” च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विद्यापिठात स्पर्धा परीक्षा नेट,सेटसाठी कोचिंग सेंटर सुरू करण्यात यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांना जेणकरून विद्यापीठात जळगांव,धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशातच सहायक प्राध्यापक परीक्षेची तयारी देखील असंख्य होतकरू विद्यार्थी करीत आहेत. पण योग्य मार्गदर्शन अभावी बरेच विद्यार्थ्याना अपयशाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता त्यांना विद्यापिठात योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, जेणेकरून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी हे देखील स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करून उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं योगदान हे देशाला मिळेल विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ह्या उपक्रमातून पुढील काही वर्षात असंख्य असे विद्यार्थी हे MPSC,UPSC,NET-SET अशा परीक्षांमध्ये यश संपादन करून उत्तर महाराष्ट्र तसेच विद्यापीठाचे नाव देश पातळीवर उंचावेल ह्या आशेने आपण ह्या उपक्रमाला चालना द्यावी अशा आशयाचं निवेदन आज महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन “मासू” क. ब.चौ. उमवी कमिटीचे अध्यक्ष योगेश माळी व पदाधिकाऱ्यांनी सादर केले. यावेळी योगेश माळी, प्रविण देशमुख,चेतन वाघे, राऊस वाडे आदि उपस्थित होते.