<
आ. राजुमामा भोळे,पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ.किरण पाटील यांनी दिली रक्तदान शिबिरास भेट
जळगाव,(प्रतिनिधी)- श्री राजपूत करणी सेना, साई ग्रुप व इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे कुसुंबा येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरास आमदार राजू मामा भोळे,पद्मश्री डॉ. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, आमदार राजू मामा भोळे यांनी सदिच्छा भेट दिली.
श्री राजपूत करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व साई ग्रुपचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार राजू मामा भोळे यांनी रक्तदानाचे महत्व विशद करीत सामाजिक कार्य आणि या रक्तदान संघटनेच्या शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करीत आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच संघटनेच्या प्रत्येक समाजोपयोगी कार्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करनीसेनेचे खान्देश कार्याध्यक्ष विलाससिंग पाटील यांनी केले.जिल्हा प्रमुख विठ्लसिंह मोरे, जिल्हा उपाध्यक्ष बी.एच. खंडाळकर यांनी दिली. प्रा.डॉ.विश्वजित सिसोदिया यांनी महाराणा प्रतापसिंह, जिजामाता, स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच महापुरुषांच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी संघटनेच्या आगामी कार्याची माहिती दिली. त्यांनी बी.एन.पाटील यांच्याकडे संघटनेच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. कोरोना काळातील कारोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले.
या वेळी काँग्रेसचे लोकसभा क्षेत्र प्रमुख दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य पवन सोनवणे, आरपीआय (आठवले गट) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, अभिजीत पाटील, राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, बापुसींग राणा, संतोष बारी, भरत देशमुख, उद्योजक भारत सिंग पाटील,ज्ञानेश्वर पाटील, संग्रामसिंह राजपूत, आशिष हाडा,निलेश सिसोदिया, राहुल पाटील, अजय पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. इंडीयन रेडक्रास सोसायटीचे डॉ. ए. डी. चौधरी, सुनीता वाघ, किरण बावस्कर, रुपाली बड गुजर, समाधान वाघ यांनी रक्त संकलन केले. सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले.