Tuesday, December 5, 2023
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/01/2023
in राज्य
Reading Time: 1 min read
ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करण्याचे नागरिकांना आवाहन

मुंबई, दि. १६ : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी असलेल्या ध्वजदिन निधी संकलनासाठी सन २०२२- २३ या वर्षाकरीता ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून नागरिकांनी या निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव ल. गो. ढोके यांनी केले आहे.

माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमासाठी संपूर्ण देशात ७ डिसेंबर हा दिवस ‘ध्वज दिन’ म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त ७ डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी संकलित केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. मे १९९९ पासून जम्मू- काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या युद्धजन्य तणावाची परिस्थिती हाताळताना अथवा देशातील सर्वच क्षेत्रात, अंतर्गत सुरक्षा मोहिमेत, चकमकीत धारातीर्थी पडलेल्या सैन्य दलातील तसेच सीमा सुरक्षा बल व इतर तत्सम निमलष्करी दलातील महाराष्ट्रातील अधिकारी, जवानांना तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी १ कोटी रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते.

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/07/Kantai_-Netralaya_AD.mp4

या कार्यवाहीत अपंगत्व आलेल्या या दलातील महाराष्ट्राचे अधिकारी व जवानांना त्यांच्या अपंगत्वाचे प्रमाण लक्षात घेवून राज्य शासनातर्फे २० ते ६० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. याशिवाय अन्य योजनांनुसार राज्यातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य केले जाते. माजी सैनिकांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वज दिन निधीचा विनियोग केला जातो. यंदा राज्यासाठी ३६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी संकलनाचे उद्दिष्ट असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करून कालबद्ध कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक किंवा पोलिस उपायुक्त, जिल्हा उद्योग अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य असून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सदस्य सचिव आहेत.

कोणत्याही प्रकारच्या माजी सैनिक संघटनांना सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलीत करता येणार नाही. ध्वज दिन निधीस योगदान द्यावयाचे असल्यास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी व अध्यक्ष, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि विभागीय स्तरावर संचालक, सैनिक कल्याण विभाग यांच्या नावाने धनादेशाद्वारे जमा करावे.

ध्वज दिन निधी संकलनाचे जिल्हानिहाय उद्दिष्ट असे : कोकण विभाग : मुंबई शहर व मुंबई उपनगर- ३ कोटी ८२ लाख ९४ हजार रुपये (प्रत्येकी). ठाणे- १ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये. पालघर- २५ लाख ४८ हजार रुपये. रायगड- ६० लाख ९८ हजार रुपये. रत्नागिरी- ६१ लाख १८ हजार रुपये. सिंधुदुर्ग- ३६ लाख ९९ हजार रुपये. नाशिक विभाग- नाशिक- १ कोटी ३८ लाख ६७ हजार रुपये. धुळे- ६१ लाख १८ हजार रुपये. नंदुरबार- ३६ लाख ३० हजार रुपये. जळगाव- १ कोटी १८ लाख १० हजार रुपये, अहमदनगर- १ कोटी ८४ लाख ९८ हजार रुपये. पुणे विभाग- पुणे- २ कोटी ५९ लाख ८५ हजार रुपये, सातारा, सांगली- १ कोटी ४२ लाख २९ हजार रुपये (प्रत्येकी), सोलापूर- १ कोटी ५४ लाख ४१ हजार रुपये, कोल्हापूर- १ कोटी ६० लाख ७९ हजार रुपये. औरंगाबाद विभाग- औरंगाबाद- १ कोटी २० लाख रुपये, जालना- ३८ लाख ३० हजार रुपये, परभणी- ३५ लाख ४५ हजार रुपये, हिंगोली- २८ लाख रुपये, बीड- ३५ लाख ३० हजार रुपये, नांदेड- ४५ लाख ३० हजार रुपये, उस्मानाबाद- ५१ लाख २८ हजार रुपये, लातूर- ४२ लाख २२ हजार रुपये. अमरावती विभाग- अमरावती- १ कोटी १० लाख रुपये, बुलढाणा- ५३ लाख ३८ हजार रुपये, अकोला- ७३ लाख ३० हजार रुपये, वाशीम- ४८ लाख ५३ हजार रुपये, यवतमाळ- ५९ लाख ६८ हजार रुपये. नागपूर विभाग- नागपूर- १ कोटी ९१ लाख ९८ हजार रुपये, वर्धा- ६० लाख ६१ हजार रुपये, भंडारा- ३५ लाख ४५ हजार रुपये, गोंदिया- ३३ लाख ४५ हजार रुपये, चंद्रपूर- ३९ लाख ८४ हजार रुपये, गडचिरोली- २७ लाख ७६ हजार रुपये.

विभागनिहाय ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट असे : कोकण – ११ कोटी ३५ लाख ३१ हजार रुपये, नाशिक – ५ कोटी ३९ लाख २३ हजार रुपये, पुणे- ८ कोटी ५९ लाख ६३ हजार रुपये, औरंगाबाद- ३ कोटी ९५ लाख ८५ हजार रुपये, अमरावती- ३ कोटी ४४ लाख ८९ हजार रुपये, नागपूर- ३ कोटी ८९ लाख ९ हजार रुपये. एकूण ३६ कोटी ६४ लाख रुपये.

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

उद्योजकाकडे आठ लाखांची खंडणीची मागणी

Next Post

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकांचा सहभाग महत्वाचा-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया

Next Post
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकांचा सहभाग महत्वाचा-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकांचा सहभाग महत्वाचा-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांना आविष्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जाहीर

गांधी रिसर्च फाऊंडेशन व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित

क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

क. ब. चौ. उमवीच्या अध्ययन व संशोधन केंद्राच्या प्रमुखपदी डॉ. नितीन बडगुजर यांची निवड

२६/११ तील वीर शहीदांना आदरांजली

२६/११ तील वीर शहीदांना आदरांजली

संविधान दिन – विशेष लेख;२६ नोव्हेंबर ‘संविधान दिना’ ची माहिती !

संविधान दिन – विशेष लेख;२६ नोव्हेंबर ‘संविधान दिना’ ची माहिती !

काव्यरत्नावली चौक उजळला…

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

TITAN HOSPITAL JALGAON

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/06/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

कोरोना संदेश

जाहिरात

जाहिरात

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

सत्यमेव जयते न्युज दिनदर्शिका – २०२२

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
%d bloggers like this: