Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जैन इरिगेशनचा ‘ब’ संघ टाईमस् शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ‘ड’ गटात अंतिम विजेता

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
जैन इरिगेशनचा ‘ब’ संघ टाईमस् शिल्ड क्रिकेट स्पर्धेच्या ‘ड’ गटात अंतिम विजेता

मुंबई दि.21 प्रतिनिधी – मुंबई येथे नॅशनल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर आज झालेल्या टाईम शिल्ड क्रिकेट स्पर्धेत ‘ड’ गटात अंतिम सामना जैन इरिगेशन ‘ब’ संघ विरुद्ध महिंद्रा लॉजिस्टिक यांच्यादरम्यान खेळण्यात आला. नाणेफेक जिंकून जैन इरिगेशन ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजीसाठी महेंद्र लॉजिस्टिक संघाला आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करत महेंद्र लॉजिस्टिक्स संघाने ३० षटकात सर्व गडी बाद ११८ धावा केल्या. त्यात समीर चालके २३ आणि अर्पित धाडवे व अभिषेक पांडे प्रत्येकी १३ धावा केल्या. गोलंदाजीत जैन इरिगेशनतर्फे कर्णधार वरुण देशपांडे यांनी ९ षटकात २६ धावा देत ५ आणि समद फल्लाह ४ व अमित गावंडे यांनी १ गडी बाद केले. प्रतिउत्तरात जैन इरगेशन ‘ब’ संघाने हे लक्ष्य केवळ २२.१ षटकात २ गडी बाद ११९ धावा करून पार केला व हा अंतिम सामना ८ गडी राखून विजय मिळवला फलंदाजीत प्रतीक यादव ४१ व आदित्य राजहंस नाबाद ५२ आणि हर्ष आघव नाबाद १२ धावा केल्या.

महिंद्र लॉजिस्टिक संघातर्फे गोलंदाजीत साहिल मळगावकर व अभिषेक पांडे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. या सामन्यात पाच गडी बाद करणारा जैन इरिगेशन संघाच्या कर्णधार वरुण देशपांडे सामनावीराचा मानकरी ठरला. जैन इरिगेशन ‘ब’ संघ अंतिम विजेता ठरल्यामुळे त्यांना ‘ड’ गटातून बढती मिळून पुढील स्पर्धेसाठी ते ‘क’ गटात सामील झाले आहेत. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, संघाचे मार्गदर्शक मुंबईचे मयंक पारेख, अरविंद देशपांडे यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षक अनंत तांबेकर, मेंटोर व वरिष्ठ खेळाडू समद फल्ला यांचे अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय युवा संसद मध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा ;जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र यांचे आवाहन

Next Post

आरोग्य विभागाचे मिलिंद मनोहर लोणारी यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

Next Post
आरोग्य विभागाचे मिलिंद मनोहर लोणारी यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

आरोग्य विभागाचे मिलिंद मनोहर लोणारी यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo