<
लोकशाही सप्ताह व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त क. ब.चौ.उमवी विद्यापीठ जळगाव समाजकार्य विभागाच्या विद्यार्थांनी केली पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृती
जळगाव – (प्रतिनिधी) – २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव सामाजिक शास्त्र प्रशाळा समाजकार्य च्या विद्यार्थांनी मतदानाचे महत्व किती अमूल्य आहे तसेच लोकशाही बळकटी करणासाठी मतदानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कायद्यावर आधारलेले व लोकशाही भिमुक राज्य निर्माण करणे व सर्व सामान्य नागरिकाला न्याय हक्क बहाल करणं हा खरतर भारतीय संविधनाचा प्रमूख उद्देश आहे.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आणि आयोगाचा स्थापना दिवस २०११ पासून राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचा प्रमुख उद्देश तो म्हणजे नवमतदार जागृत करणे. त्यांना मतदाराचे महत्व व हक्क पटवून सांगणे व खऱ्या अर्थाने लोकाहीचं बळकटीकरण करणे.
हि बाब लक्षात घेऊन समाजकार्य च्या विद्यार्थांनी लोकशाही सप्ताह निमित्त जिल्ह्यात जळगाव, एरंडोल, पारोळा विविध ठिकाणी महाविद्यालय, तहसील कार्यालय, बस स्थानक, राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर, व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याठिकाणी पथनाट्य सादर केले. व त्या माध्यमातून लोकशाही मध्ये आपले मत किती महत्त्वाचे व अमूल्य आहे. सोबतच कलम १२ ते ३५ दरम्यानची जी संविधानाने मुलभूत अधिकार बहाल केली आहेत यासंदर्भात प्रबोधनाच्या माध्यमातून त्याचे महत्व पटवून जनजागृती केली. यावेळी समाजकार्य विभागाचे विद्यार्थी, प्रविण देशमुख, योगेश माळी, वैशाली सुरवाडे, जयेश साळुंके, माधव पाटील, कविता पालवे, दिपाली वाघ, प्रेम वाकळे आदिंनी पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती केली.