<
जळगाव दि.30 – के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात किल्ल्यांचा अभ्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास या विषयावर इयत्ता सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. ही कार्यशाळा गती इन्स्टिट्यूटची संचालक प्राध्यापक देवदत्त गोखले यांनी घेतली शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले किल्ले त्या मागची भूमिका त्यांचा विचार तसेच आताच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी हा किल्ल्यांचा अभ्यास कसा उपयोगी होऊ शकतो याविषयीचे अतिशय सुंदर असे विवेचन प्राध्यापक देवदत्त गोखले यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
कार्यशाळेत 100 विद्यार्थी सहभागी झाले.
या विद्यार्थ्यांची चाचणी सुद्धा घेण्यात आली प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गोखले सरांकडून पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इ.पी.पाचपांडे, व्ही. एस. गडदे, सतिश भोळे, एम. एस. नेमाडे यांनी सहकार्य केले.