<
जळगाव दि.31 – शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन खिरोदा येथील शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस.टी. भूकन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. बारी, बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष ॲड. प्रविण पाटील, शिरसोलीचे सरपंच प्रविण दामधर, शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकर तांदळे, गोपाळ बारी कार्यक्रम अधिकारी प्रा. गणपत धुमाळे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती लोखंडे मंचावर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. भुकन यांनी रासेयो चे उद्दीष्ट स्पष्ट करून युवकांचे विचार आचार विकसित करण्यात या उपक्रमाचे महत्व अधोरेखित केले. तत्पूर्वी प्राचार्य डॉ रेड्डी यांनी समतेचे तत्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांची जबाबदारी काय आहे ते स्पष्ट केले. तसेच बारी यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे महत्व सांगून सर्व प्रकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा धुमाळे यांनी केले तर शेवटी मान्यवरांचे आभार निलेश बारी यांनी मानले. तसेच सायंकाळी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासेयो विभागाचे संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी भेट देऊन स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करून स्वतःच्या सर्वांगिण विकासासाठी लाभ घेण्याचे व समाजाप्रतीची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले.