<
जळगाव – (प्रतिनिधी) – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव (आय एम आर ) आणि कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव च्या संयुक्त तत्वधानांतर्गत आयोजित अक्षरधाम, (बीएपीएस) स्वामीनारायण मंदिर येथील प्रेरक वक्ते स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट, बी डिफरेन्ट, सकसिड डिफरेन्ट (Think Different, Be Different, Succeed Different ) या विषयावर व्याख्यान दि. २ फेब्रुवारी सांयकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात केले आहे. अशी महिती केसीई सोसायटी संचलित आय एम आर च्या संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी दिली.
यावेळी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे डॉ. संजय सुगंधी, केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर आदी उपस्थित होते.
आदरणीय परमपूज्य श्री स्वामी ज्ञानवत्सलदासजी मेकॅनिकल इंजिनिअर असून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलँड आणि इतर युरोपीय देशांतून आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक सेमिनारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून आदराने निमंत्रित केले जाते. स्वामीजी प्रेरक वक्ता आहेत आणि प्रोएक्टिव्ह आणि एथिक्स यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांची आपल्या व्याख्यानातून सहजच उकल करीत ते स्मार्ट मॅनेजर्स आणि सक्षम पुढारी यातील अंतर आपल्या श्रोत्यांना पटवून देतात तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन, व्यवसायातील नैतिकता, मानवीयवृत्ती एकगुरुकिल्ली, चारित्र्य म्हणजे आनंदाचे घर, वर्क-लाइफ बॅलन्स आणि इतर अनेक विषयांवर ते भरभरून बोलतात.सामाजिक माध्यमांवर स्वामीजींचे अगणित फॉलोवर असून 2021 मधील सर्वश्रेष्ठ दहा प्रेरक भारतीय वक्त्यांच्या यादीत त्यांचा क्रमांक खूपच वरचा आहे. अशी माहिती डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी दिली.