<
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड दिपक सपकाळे,जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन, जिल्हा उपाध्यक्ष ॲड अरुण एस चव्हाण, विद्यापीठ कमिटी अध्यक्ष योगेश माळी, उपाध्यक्ष प्रविण देशमुख, प्रविण शिंदे, ऋतिक महाले, प्रशिक तायडे, उदय पाटील आदी
जळगाव-(प्रतिनिधी) – नुकताच विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचा निकाल लागला असून त्यामध्ये विविध विद्यार्थी त्यांच्या निकालाबाबत संभ्रम आवस्थेत आहेत.
त्याचबरोबर बरेच विद्यार्थी हे पाच ते सहा विषय बॅक आहेत तर काही विद्यार्थी सर्व विषय नापास आहेत तसेच बरेच विद्यार्थी यांना शुन्य मार्क आहेत, त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्थेत आहेत. परीक्षा विभागाच्या तांत्रिक चुकामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय कारक परिस्थिती उद्भवली आहे. बरेच विद्यार्थी पेपर लिहून सुद्धा त्यांना शून्य मार्क मिळाले आहेत. तसेच काही विद्यार्थी हे पेपरला हजर असून सुद्धा गैरहजर दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून या तांत्रिक चुका दुरुस्त करण्यात याव्यात व विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात यावा अशा आशयाचं निवेदन आज महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडुन परीक्षा नियंत्रक डॉ दिपक दलाल सर यांना सुपूर्द करण्यात आले.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड दिपक सपकाळे,जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन, जिल्हा उपाध्यक्ष ॲड अरुण एस चव्हाण, विद्यापीठ कमिटी अध्यक्ष योगेश माळी, उपाध्यक्ष प्रविण देशमुख, प्रविण शिंदे, ऋतिक महाले, प्रशिक तायडे, उदय पाटील आदी उपस्थित होते.