<
जळगाव – (उमवी प्रतिनिधी) – आज रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासू)ची संघटन बांधणी करण्यात आली. मासु महाराष्ट्रभर तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी एक अराजकीय संघटना आहे. विद्यार्थी हित हेच एकमेव मासूचे अंतिम ध्येय आहे. आज विविध ठिकाणी शिक्षणासाठी लाखो रुपये विद्यार्थ्याना शिक्षणासाठी भरावे लागतात, व तरी सुद्धा तळागळातील सर्वसामान्य विद्यार्थांना समाधान कारक योग्य शिक्षण मिळत नाही. तर हे कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी मासू कार्यरत आहे.
आज विद्यार्थी हित लक्षात घेऊन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची संघटन बांधणी करण्यात आली. यावेळी विद्यापीठातील विविध पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्यात. विद्यापीठ मीडिया प्रमूख पदी प्रशिक तायडे, होस्टेल प्रमुख पदी पृथ्वीराज पाटील, शितल पवार, कोमल पाटील, निखिता सोन्नी, आशाबाई पाटील, निशा पावसे, विशाखा धात्रक आदींची निवड मासूचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा अध्यक्ष रोहन महाजन जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अरुण एस. चव्हाण विद्यापीठ कमिटी अध्यक्ष योगेश माळी उपाध्यक्ष प्रविण देशमुख, सुभाष पाटील प्रविण शिंदे ऋतिक महाले विविध प्रशाळेतील विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.