<
लोहारा ता पाचोरा (रिपोटर ईश्वर खरे)-द-शेंदुर्णी सेकं एज्यु को-ऑप सोसा द्वारा संचलित डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी शिवजयंती दि 19 2 2023 वार रविवार रोजी उत्सवात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपशिक्षक ए. एम तडवी होते विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस परदेशी जेष्ठ शिक्षक पी एम सुर्वे आर जी बैरागी आर सी जाधव एन व्ही बोरसे एस बी सावकारे इ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी उपस्थित होते सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एस परदेशी उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व कै आचार्य बापूसाहेब गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीला जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत सादर करण्यात आले व हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत आहे हे घोषीत केले यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत पर भाषणे सादर केली.
शिक्षकांमधुन बी एन पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयीची माहिती दिली पि यु खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी गीत सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष ए एम तडवी सर यांनी आपल्या भाषणातून शिवाजी राजांच्या स्वराज्य स्थापने विषयीची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही एम शिरपूर यांनी केले व आभार वाय पी वानखडे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.