<
पनवेल – (प्रतिनिधी) – दिल्ली पब्लिक स्कूल सांगूर्ली पनवेल या खाजगी शाळेच्या दुसरा व तिसऱ्या माळ्यांचा श्री सिद्धिविनायक ज्ञानमंदिर एज्युकेशनल ट्रस्ट सिडको/नैना अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जपून अनधिकृत वापर करीत असून तिथे गेल्या पाच वर्षांपासून विद्यार्थ्यांचे वर्ग भरवीत आहे.
या शाळेकडे फक्त तळमजला व पहिल्या माळेपर्यंत भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे परंतु दुसऱ्या व तिसऱ्या माळ्यासाठी अजूनही फायर ना हरकत (FIRE NOC आणि भोगवटवा प्रमाणपत्र (OC) मिळालेले नाही.
विद्यार्थ्यांकडून लाखोची फीस लुटायची, शासनाच्या नियमांचे पालन न करता महसूल बुडवायचा व अधिकाऱ्यांचे तोंड लाच देऊन बंद करायचे हा भ्रष्ट कारभार महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, पनवेल तालुका ग्रामीणचे कार्यकारिणी सदस्य श्री. श्रीयश ठोकळ यांनी उघडकीस आणला असून DPS शाळा व नैना /सिडको अधिकारी यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी ते लढत आहेत.
शिक्षण हे सर्वांसाठी, विक्रीसाठी नव्हे या आमच्या ब्रीदवाक्यानुसार ठोकळ हे सिडको भवन येथे दि २३/०२/२०२३ रोजी उपोषणास बसले असता श्रीमंत. संभाजी राजे यांनी सुद्धा तेथे भेट देऊन मुद्दे समजून घेतले व याचाच परिणाम म्हणून नैना मुख्य नियोजनकार श्री. मानकर यांनी पुढील एक महिन्यात शाळा प्रशासन व भ्रष्ट नैना सिडको अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषण तात्पुरते स्थागित करण्यात आले आहे.दिलेल्या कालावधीत जर कारवाई होत नसेल तर नैना/सिडको तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा ईशारा यावेळी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन कडून देण्यात आला.
याप्रसंगी मासू चे मुंबई प्रदेश अध्यक्ष श्री. विकास शिंदे, रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य अँड.हेमंत शिंदे, पनवेल शहर कार्यकरणी सदस्य अँड.अक्षय गवळी, गणेश पारधी , संदेश ठोबरे तसेच सागर बिराडे, गोपाळ गिरासे,सिद्धार्थ खिलारे, आदित्य हाके व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.