<
अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी विजेत्या आणि उपविजेत्या संघासोबत मंचावर(डावीकडून) प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, ॲड. प्रकाश बी. पाटील, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मा. एस. जी. मेहरे, प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, मा. एम. क्यू. एस. एम. शेख, ॲड. प्रमोद पाटील, डॉ. विजेता सिंग
जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृती १६ व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मा. श्री. एस. जी. मेहरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये हवेली इन्स्टिट्यूट ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्चच्या संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे फिरता चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे फिरते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ अमरावती या संघाने प्राप्त केले. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ अमरावतीच्या कु. म्रीनमई निस्ताने हिला उत्कृष्ट विद्यार्थिनी वकील साठीचे चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक देण्यात आले. तसेच पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ अमरावतीच्या नचिकेत बाविस्कर यास उत्कृष्ट विद्यार्थी वकील साठीचे चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कमेचे पारितोषिक बहाल करण्यात आले. त्याचबरोबर चषक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेचे उत्कृष्ट मेमोरियल पारितोषिक पुणे येथील भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज यांना देण्यात आले.
यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. एम. क्यू. एस. एम. शेख, के. सी. ई. सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश बी. पाटील, के. सी. ई. सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रमोद पाटील यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी, समन्वयक डॉ. विजेता सिंग हे होते.
कार्यक्रमास पॅनल जेजेस म्हणून स्पर्धेचे परीक्षण केलेले जिल्हा न्यायालयीन अधिकारी एस. आर. पवार, एस.एन. माणे, डी.वाय. काळे, व्ही.व्ही. मुगलीकर, एस.पी. सय्यद, जे. जी. पवार, सोनवणे, खंदारे, देशमुख, जिल्हा बारचे सन्माननीय वकील ॲड. महेश भोकरीकर, रवी पाटील, सत्यजित पाटील, आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. डी. आर. क्षीरसागर, डॉ. रेखा पाहुजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. अमिता वराडे, प्रा. बी. एस. पाटील, प्रा. ललिता सपकाळे, प्रा. स्वाती लोखंडे, प्रा. ज्योती भोळे हे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना न्या. एस. जी. मेहरे यांनी वकिली हा केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय नाही तर ती एक सामाजिक जबाबदारी आहे, त्यात पक्षकाराचे समाधान खूप महत्त्वाचे असते. श्रमाला न्याय मोबदला मिळवून दिला गेला पाहिजे ही जबाबदारी वकिलांची असल्याचे अधोरेखित केले. संविधान हे सर्वोच्च असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि वकिली कौशल्य प्राप्त करण्यासाठी अभिरुप न्यायालय आवश्यक असल्याचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. माहेश्वरी यांनी अभिमान सकारात्मक ऊर्जा असून अहंकार ही विध्वंसक ऊर्जा असते तेव्हा अहंकारापासून दूर राहा असा संदेश दिला. न्या. शेख यांनी वकिलानी स्वतःला कायम अद्यावत ठेवले पाहिजे असे प्रतिपादन केले. ॲड. प्रकाश पाटील आपल्या मार्गदर्शनात सर्व सहभागी स्पर्धा आणि विजेत्या संघाचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात उपस्थित मान्यवर पाहुणे आणि सर्व सहभागी स्पर्धकांचे स्वागत केले. न्या. मेहरे यांचा संस्थेच्या वतीने ॲड. प्रकाश पाटील यांनी सत्कार केला त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचेही सत्कार करण्यात आले.
विजेत्यांच्या नावाची घोषणा डॉ. डी. आर. क्षीरसागर यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अमिषा मुंदडा आणि अमन मुंदडा यांनी केले. शेवटी मूड कोर्ट सोसायटीचे समन्वयिका डॉ विजेता सिंग यांनी आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी समीर, अमिषा, श्रेया, ईशा, अमन, विधी, साक्षी, सरोज आणि शिक्षकेतर कर्मचारी झांबरे, अहिरे, तडवी, पाटील, चौधरी, चिरमाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.