Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलमध्ये विज्ञान दिनी प्रोजेक्ट प्रदर्शनीचे आयोजन;विद्यार्थ्यांसह पालकांसाठी १ मार्च ला प्रदर्शन खुले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/02/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
अनुभूती निवासी स्कूलमध्ये विज्ञान दिनी प्रोजेक्ट प्रदर्शनीचे आयोजन;विद्यार्थ्यांसह पालकांसाठी १ मार्च ला प्रदर्शन खुले

जळगाव दि. २६ प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘अनुभूती इनोव्हेशन’ सेंटर असून विद्यार्थांच्या कल्पकतेला वाव देत संशोधात्मक वृत्ती यातून जोपासली जाते. वर्षभर विद्यार्थी मेकॅनिकल अँडव्हांटेज, मॅग्रेटीक लिफ्टचे उपकरण, व्हाइस कंट्रोल ऑन ऑफ सिस्टम यासह विज्ञानावर आधारित विविध मॉडेल, प्रोजेक्ट शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली साकारतात.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, भौतिकशास्त्रातील प्राथमिक बाबी समजाव्या जेणे करून विद्यार्थी अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपकरणे, मॉडेल, प्रोजेक्ट तयार करतात, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये ‘विज्ञान दिनी’ दि. २८ फेब्रुवारी ला विज्ञानासंबंधीत विविध विषयानुसार प्रोजेक्ट प्रदर्शनी व सादरीकरण विद्यार्थ्यांकडून होईल. १ मार्च पर्यंत हे प्रदर्शन असेल. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, डॉ. आर. स्वामीनाथन यांच्याहस्ते होईल.

विज्ञान या ज्ञानशाखेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाला धरून संशोधनात्मकदृष्टीने सादरीकरण केले जाईल. सोबतच माहिती तंत्रज्ञान, गणित, इंजिनेअरिंग, कॉम्प्युटर, रोबोटिक्स तंत्रज्ञानावर आधारित साधारणत: ३७ प्रोजेक्टचे अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण केले जाईल. सादरीकरणामधील विशिष्ट विषयांवर प्रश्नोत्तर स्पर्धा घेतली जाईल. यानंतर तज्ज्ञ परिक्षकांकडून प्रोजेक्ट सादरीकरणातील विजेते निवडले जातील. विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनीसाठी निमंत्रीत काही शाळांमधील विद्यार्थ्यांनासुद्धा आपले प्रोजेक्ट सादरीकरणाची संधी असेल.

संशोधनाला चालना देण्यासाठी प्रदर्शन सर्वांसाठी खुले
विद्यार्थ्यांमधील नवनवीन कल्पनांना संशोधकदृष्टीने चालना मिळावी, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमधील प्रोजेक्ट हे इतर स्कूल मधील विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी पाहता येणार आहे. इयत्ता ४ ते ९ मधील विद्यार्थी व त्यांचे पालकांना हे प्रदर्शन दि. १ मार्च ला दुपारी ३ ते ६ या वेळेत अनुभूती निवासी स्कूल येथे पाहता येणार आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्या पाल्यांमधील संशोधकवृत्तीला हेरून, वैज्ञानिकदृष्टीने त्याला आधार देण्यासाठी जास्तीतजास्त पालकांनीसुद्धा प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने अनुभूती निवासी स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रयोगशिलतेतून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास – दिलीप जोशी

Next Post

जिल्हास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post
जिल्हास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

जिल्हास्तरीय शिक्षक निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo