<
निबंध स्पर्धेत चोपड्याचे संजय बारी प्रथम….
तर जळगाव येथील वर्षा अहिरराव द्वितीय…..
खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .त्यात चोपडा येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय रघुनाथ बारी यांच्या विद्यार्थ्यांवरील समाज माध्यमांचा परिणाम या निबंधाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर जळगाव येथील या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती वर्षा अहिरराव यांच्या निबंधाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून संस्थेने निकाल घोषित केला.
बक्षीसपात्र शिक्षक:
प्रथम : संजय बारी सर, चोपडा
द्वितीय: श्रीमती वर्षा अहिरराव मॅडम, जळगाव
तृतीय: सौ. वीणा बाविस्कर, जळगाव
उत्तेजनार्थ: श्री.निर्मल चतुर सर, बामनोद ता. यावल
बक्षीसपात्र शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चांदसरकर ,माजी अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी ,मुख्याध्यापिका सीमा वैजापूरकर, शताब्दी महोत्सव समिती प्रमुख एस. डी.भिरुड यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री.आर.डी.कोळी, सौ.एस.एस.पाटील यांनी परिश्रम घेतले.संस्थेच्या शताब्दी स्मरणिकेत बक्षीस पात्र शिक्षकांचे निबंध प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.