<
जळगाव – (प्रतिनिधी) – शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांच्या आज दिनांक 28- 2- 2023 रोजी च्या पत्रान्वये आर टी ई 25% प्रवेशासाठी दिनांक 1 मार्च 2023 दुपारी 3 वाजेपासून ते 17 मार्च 2023 रात्री बारा दरम्यान पात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत अशा सूचना शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर संचालक कार्यालयामार्फत राज्यस्तरावर संपूर्ण राज्याची ऑनलाइन लॉटरी काढण्यात येईल व त्यामध्ये निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल . तालुकास्तरावरील पडताळणी समितीमार्फत निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येऊन पात्र उमेदवारांचा प्रवेश अंतिम करण्यात येईल . चुकीची व खोटी माहिती देऊन तसेच एका मुलाचे दोन अर्ज करून प्रवेश मिळविल्यास असे प्रवेश रद्द करण्यात येतील असेही प्राप्त सूचनांमध्ये कळविण्यात आलेले आहे .
करिता पालकांनी पात्र मुलांचे अर्ज student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. जळगांव यांनी केले आहे . अर्ज करतांना काही अडचण असल्यास पालकांनी नजीकच्या गट साधन केंद्र पंचायत समिती येथील मदत केंद्रात संपर्क करावा असेही शिक्षण विभागामार्फत कळविले आहे.