<
लोहारा ता.पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
लोहारा तालुका पाचोरा या ठिकाणी दमोताबाई सुर्वे वाचनालय आहे या वाचनालयात नेहमीच सकाळी गर्दी असते ती वाचकांची यामध्ये विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक विविध वृत्तपत्रे व पुस्तके वाचून आपल्या ज्ञानात भर पाडत असतात. यामध्ये भरपूर विद्यार्थी वाचनालयामध्ये वाचन करून विविध ठिकाणी नोकरीमध्ये कामाला लागले आहेत त्यातच लोहारा गावातील सैनिक हे सर्वसामान्य कुटुंबातून असल्यामुळे त्यांचा अभ्यास हा वाचनालयातच झाला.
आपण काहीतरी वाचनालयासाठी मदत देऊया म्हणून सैनिक चंद्रकांत गीते यांनी सर्व आपल्या सैनिक बांधवांना सूचना केली त्यातून सर्व सैनिकांनी मिळून १३८९५ रुपये एवढी आर्थिक मदत वाचनालयाच्या अकाउंटला जमा केली. त्यामध्ये सैनिक,भिका जाधव ७२१,नितीन क्षीरसागर ५००, विजय वारुळे ५५१,चेतन क्षीरसागर ५००,वाल्मीक धनगर ५०१,मोतीलाल पाटील ५००,संदीप बाविस्कर ११११,शांताराम ओतारी १०००,राजू सूर्यवंशी १०००, राजू कोळी ५००,सौरभ शेळके, ५०१,उमेश सूर्यवंशी ५०१,शंकर खाटीक ५०१, अरुण भडके ५०१,चंद्रकांत गीते ५००, ज्ञानेश्वर देशमुख ५०१, नामदेव माळी ५०१, संदीप चौधरी ५०१,मनोज शेळके५०१, ईश्वर क्षिरसागर ५०१, प्रवीण चौधरी ५०१, गोपाल पाटील १५०१,यांनी मदत दिली.निधी जमा करण्यासाठी सैनिक चंद्रकांत गीते (सीआरपीएफ) व सर्व सैनिकांनी परिश्रम घेतले.या कामी सर्व स्तरातून सैनिकांचे कौतुक होत आहे.