<
जळगाव – (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे निमित्ताने बांभोरी प्र.चा. ता-धरणगाव येथे समता फौंडेशन,मुंबई व बांभोरी प्रचा उपकेंद्र तसेच बांभोरी प्रचा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन व गावाच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा नागरी सत्कार ग्रामपंचायत तर्फे करण्यात आला.
समता फौंडेशन,मुंबई व आरोग्य केंद्र तसेच बांभोरी प्र.चा.ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील कुपोषित मुले,अति जोखमीच्या गर्भवती माता,महिला यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आला.तसेच गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता जिजाऊ,यांचे जीवनावर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.
बांभोरी गावातील गर्भवती माता व मुलांना सुदृढ आयुष्य मिळावे यासाठी ग्रामपंचायत व उपकेंद्र तर्फे सर्व उपाययोजना करण्यात येतील तसेच गावात स्त्री-पुरुष समानता,लिंग भेद दूर करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येतील व असे मत बांभोरी प्रचा चे सरपंच श्री.सचिन बिऱ्हाडे यांनी व्यक्त केले.त्याचप्रमाणे मुलांना व मातांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजी बाबत व महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेले संविधानिक अधिकार बद्दल आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले.
तसेच समता फौंडेशन,मुंबई चे श्री.राजेंद्र दोंड यांनी समता फौंडेशन च्या ग्रामीण भागातील कुपोषित बालक व गर्भवती माता च्या आरोग्यासाठी कार्यतत्पर राहील माहिती दिली.
महिला दिनाच्या मंगल प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील,सीआरपी- सौ.अश्विनी नन्नवरे, आशा सेविका-सौ.सपना नन्नवरे, सौ.अंजना नन्नवरे, सौ.सोनी नन्नवरे,सौ.नीता साळुंके अंगणवाडी सेविका-सौ.इंदूबाई ठाकरे, सौ.आशाबाई बडगुजर,सौ.अनिता सोनवणे, सौ.रंजनाताई नन्नवरे,सौ.शोभा सपकाळे,सौ.अंजना सपकाळे,सौ.अनिता साळुंके.शिक्षक-सौ.सविता बाविस्कर,तसेच सौ.आशा भालेराव,सौ.मीराबाई नन्नवरे, यांचा पुस्तक व पुष्प देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.जगदीश नन्नवरे,श्री.संदीप कोळी,श्री.अमोल नन्नवरे, MPW श्री.प्रशांत पाटील,श्री.महेश बनसोडे,श्री. व गावातील युवक-युवती महिला व बालक यांची प्रमुख उपस्थिती होती.💐👍💐🩺