<
जळगाव – (प्रतिनिधी) – लांडोरखोरी उद्यान मोहाडी रोड जवळ स्थित जे. के. ( ज्योतिक्रिष्णा ) इंग्लिश स्कूल च्या विध्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अप्रतिम असे नृत्य नाटिका प्रस्तुतीत शिवाजी महाराजांचे अफझल खान चे वध दाखवीनन्यात आले. गोपालदास सोपानदास (जी. एस ) ग्राउंड वरील शिवाजी पुतळ्या समोर कार्यक्रम करण्यात आले. सर्वप्रथम विध्यार्थी यांनी शिवाजी महाराजांची आरती केली पुतळ्या ला हार घातला.मुख्यधापिका सौं. ज्योती श्रीवास्तव मॅम च्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिक्षक स्वामी सोनार सर यांनी अप्रतिम नृत्य नाटिका विध्यार्थ्यांना शिकविले ज्या मध्ये 5 वि ते 9 वी च्या विद्यार्थ्यांचे सहभाग होते.
क्रिश मुकुंदा पाटील – शिवाजी महाराज
गौरव बारसे – अफझलखां, जिज्ञासा गवळी – जिजाऊ माता
मावळे श्रेयस इंगळे, ललित राजकुमार सैनी, निखिल बविस्कर, रिषभ तायडे, सिद्धांत सपकाळे, कृष्णाली हटकर.
शाळेच्या सुपरवायसर सौं कामिनी मिस्त्री सह शिक्षक वृंद माया पाटील, चारुशीला पाटील, छाया शिरसाळे, रेवती चौधरी, प्रगती परदेशीं, पूनम पाटील, ललिता पाटील शिक्षेकेतर कर्मचारी सुनील चौधरी, अरुण गायकवाड, संभाजी गवळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.