<
जळगाव – (प्रतिनिधी) – केशराईरी हॉल जळगांव आणि के के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ योगा नॅचरोपॅथी आणि रिसर्च जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या मार्गदर्शनाने दि. 12 मार्च 2023 रविवार रोजी, दुपारी 2 ते 6 या वेळात निसर्गोपचार आरोग्य आणि समुपदेशन शिबिराचे आयोजन केलेले आहे.
दैनंदिन धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या आरोग्यांच्या अडचणी योग साधनेने आणि नैसर्गिक पद्धतीने कशा सोडवता येतील या संदर्भातील संपूर्ण माहिती या आरोग्य शिबिरात देण्यात येणार आहे. निसर्गोपचार व योगयुक्त निरोगी जीवनशैलीच्या प्रसार व प्रचारासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिर हे केसराई हॉल व्यंकटेश नगर- हरिविठ्ठल नगर बस स्टॅाप जवळ जळगाव या ठिकाणी आयोजित केलेले आहे.जास्तीत जास्त लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केसराई हॉलचे संचालक श्री. उत्तम अहिरे आणि डॉ.अनिता पाटील अध्यक्ष महाराष्ट्र योग असोसिएशन यांनी केले आहे. या शिबिराचे नोंदणी आता ऑनलाइन पद्धतीने तसेच प्रत्यक्ष स्थळावर त्याच दिवशी कार्यक्रमाच्या वेळी ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.