<
पाचोरा-(प्रतिनिधी) – तालुक्यातील वरसाडे तांडा येथील ग्रामपंचायत सदस्य डॉ. नितीन वर्जन चव्हाण यांनी ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामपंचायत वरसाडे तांडा व पवन तुकाराम पवार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारीने केला होता. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांनी पाचोरा गट विकास अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. त्या चौकशी अंती जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने डॉ. नितीन वर्जन चव्हाण यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते.
याविरुद्ध डॉक्टर नितीन चव्हाण यांनी नाशिक अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील अर्ज दाखल केले होते, परंतु अपिलाच्या वेळेस डॉक्टर नितीन चव्हाण आणि पवन तुकाराम पवार यांच्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मध्यस्थीने आपसात समझोता करण्यात आला होता व तारखेच्या दिवशी पवन तुकाराम पवार यांनी डॉक्टर नितीन चव्हाण यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जाऊ नये म्हणून आपसात समझोता झाल्याबाबत चे पुरसिस दिली. त्या पुरसिस मुळे डॉक्टर नितीन चव्हाण यांची ग्रामपंचायत सदस्य पद वाचल्या मुळे गावात व परिसरात डॉक्टर नितीन चव्हाण व पवन पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.