<
जलचक्र,ता.बोदवड (प्रतिनिधी) – येथे ग्रामीण स्वयम रोजगार प्रशिक्षण संस्था जळगाव व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालय ता.बोदवड यांच्या संयुक्त विद्यमानाने जलचक्र येथे बचत गटातील महिलांना 10 दिवसीय अगरबत्ती बनवणे या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते त्यां ना अगरबत्ती या विषयावर कौशल्य प्रशिक्षण व उद्योजकता विकास कार्यक्रम अशा दोन प्रकार च्या प्रशिक्षणाचे देण्यात आले त्यात त्यांना बाजारपेठ सर्वेक्षण,विपनण व्यवस्थापन,मार्केटिंग, पेकेजींग,संभाषण कौशल्य,बँकिंग व्यवहार,उद्योजकीय सक्षमता,प्रकल्प अहवाल या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले व व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या प्रकारचे गुण असावेत या विषयावर आर सेटी संचालक – श्री. अरुण कुमार सिंह सर यांनी मार्गदर्शन केले तसेच म.रा.ग्रा.जी.अभियान तालुका अभियान व्यवस्थापक बोदवड.श्री. संदीप मेश्राम सर,दिपक भामरे,अनिता पाटील मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच श्री.देवेंद्र महाजन,प्रिती चितोडकर,श्री.करणसिंग सोलंकी,श्री.राहुल संदानशिव मार्गदर्शन मिळाले आणि अगरबत्ती बनवणे या विषयावर प्रात्यक्षिक चे प्रशिक्षण बबिता चव्हाण यांनी दिले.
तसेच जलचक्र गावातील जि.प.विद्यालय शिक्षक व शिक्षिका, CRP – सुनिता खरे व उपस्थीत प्रशिक्षणार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप दि.12.03.2023 रोजी प्रशिक्षणाचे मुल्यमापन जळगाव आर सेटी येथे करण्यात आला.