<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथे केशराईरी हॉल जळगांव आणि के के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ योगा नॅचरोपॅथी आणि रिसर्च जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या मार्गदर्शनाने दि. 12 मार्च 2023 रविवार रोजी, दुपारी 2 ते 6 या वेळात निसर्गोपचार आरोग्य आणि समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनंदिन धकाधकीच्या जीवनात येणाऱ्या आरोग्यांच्या अडचणी योग साधनेने आणि नैसर्गिक पद्धतीने कशा सोडवता येतील या संदर्भातील संपूर्ण माहिती या आरोग्य शिबिरात देण्यात आल्या आहेत तसेच निसर्गोपचार व योगयुक्त निरोगी जीवनशैलीच्या प्रसार व प्रचारासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिर हे केसराई हॉल व्यंकटेश नगर- हरिविठ्ठल नगर बस स्टॅाप जवळ जळगाव या ठिकाणी आयोजित केले होते सदर शिबिरात १०० ते १५० महिलांनी सहभाग घेतला.