<
फैजपूर – (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवतींसाठी दिनांक 8/ 3 /23 ते 13/ 3 /23 या काळात मिशन साहसी अभियान “पाच दिवसीय कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे प्रथम पुष्प दि 8/3/23 ला डॉ. सतीश चौधरी यांनी “महिला व समान संधी” या विषयावर गुंफले त्यांनी सांगितले समान संधी प्राप्त करण्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास व जाणीव जागृती पाहिजे बदलत्या समाजा नुसार स्त्रियांनी कणखर बनलं पाहिजे जेव्हा संधी मिळेल तेव्हा युवतींचं पाऊल पुढेच पडलं पाहिजे अधिकार समानतेचा अधिकार समान कार्याचा हे सांगितले.
कार्यशाळेच्या प्रथम दिवसाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप हे होते त्यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले युवतीना स्वःताचा सर्वांगीण विकास करायचा आहे तर तो स्वतःच करावा लागेल सर्व गोष्टी युवतींना अवगत पाहिजे युवतींसाठी योग ही जीवन जगण्याची कला आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले कार्यशाळेचे प्रथम दिवसाचे सूत्रसंचालन कु. माधुरी भरणे हिने व आभार दिव्या वानखेडे या विद्यार्थिनीने केले 9/3/23 या दिवशी कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.लत्ता मोरे शिक्षण शास्त्र महाविद्यालय खिरोदा यांच्या हस्ते झाले त्यांनी “महिला व स्वयंरोजगार “हा विषय मांडत असताना शिक्षणाचा उपयोग स्वयंरोजगारासाठी कसा होईल हे सांगितले तसेच वेगवेगळी कौशल्य आत्मसात करण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता असणे गरजेचे आहे.
अत दीप भव स्वतःचा मार्ग निवडा हे सांगितले कार्यशाळेच्या द्वितीय दिवसाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी होते त्यांनी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासात अशा शिबिरांचं महत्त्व पटवून दिल स्त्रियांमधील धाडस धैर्य व जागृती असल्यामुळे ती सहज स्वयंरोजगार निर्माण करू शकते हे वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे पटवून दिले दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. छाया शिरसाळे व आभार कु.वैशाली वाघ हिने केले 10/3/23.या दिवशी कार्यशाळेचे तृतीय पुष्प डॉ.प्रियदर्शनी सरोदे शामल हॉस्पिटल सावदा यांनी गुंफले त्यांनी “महिलांचे आहार आरोग्य व त्यावर उपाययोजना” हा विषय मांडताना युवतींनी स्वतःची शारीरिक मानसिक काळजी कशी घ्यावी त्याचबरोबर बदलत्या वयाप्रमाणे त्यांना आवश्यक त्या आहाराचा उपयोग त्यांनी करावा मन आनंदी असलं तर शरीर पण आनंदी असतं म्हणून नेहमी आनंदी असणं आवश्यक आहे हे विशद केलं कार्यशाळेच्या तृतीय दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डी बी तायडे हे होते त्यांनी युवतींनी सावित्रीबाईचा वारसा पुढे चालवायचा आहे त्यांची प्रेरणा घेऊन आयुष्यात शिक्षणात कसे अग्रेसर व्हावे हे सांगितले तसेच विज्ञाननिष्ठ युवतींनी श्रद्धा जोपासवी पण अंधश्रद्धा बाजूला ठेवावी हे सांगितले सूत्रसंचालन कु. महेक तडवी हिने व आभार रोहिणी माळी या विद्यार्थिनीने मानले कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.कल्पना पाटील यांनी केले.दि.11/3/2023 ला अड.प्रविणचंद्र जंगले यांनी महिला विषयक कायदे या विषयावर चौथे पुष्प गुंफले. त्यांनी सांगितले की महिलांना राज्यघटनेने समान हक्क व कायदे दिलेले आहेत तरीदेखील ग्रामीण व पाड्यावरील महिलांना समान वेतन दिले जात नाही ही खेदाची बाब आहे.
आर्टिकल 39 नुसार समान वेतनाचा अधिकार महिलांना दिलेला आहे महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करणे हे 1961 चा कायद्यानुसार दिलेले आहे कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 1994 त्यांनी सांगितला त्यानंतर महिलांच्या प्रति अत्याचार विषयक शिक्षण 4 9 8 नुसार कायदा केलेला आहे असे देखील मांडले मूलींनी कायद्याचा दुरुपयोग करू नये कायदा हा आपल्या संरक्षणासाठी आहे असे सांगितले कुटुंबाचा कणा महिला आहे असे त्यांनी मत मांडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस व्ही जाधव सर हे होते त्यांनी देखील महिलांच्या हक्काविषयी तसेच महिलांनी स्वतःचा विकास कसा साधावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री फिरके या विद्यार्थिनीने केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोपाळ कोल्हे विद्यार्थी विकास अधिकारी यांनी केले.दि.13/3/23 या दिवसाचे कार्यक्रमाचे पाचवे पुष्प उपप्राचार्य डॉ.एस व्ही जाधव यांनी “महिला सबलीकरण व समुपदेशन” या विषयावर गुंफले त्यांनी असे सांगितले की महिलांचे सबलीकरण झालेलेच आहे महिला या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे तसेच त्यांनी मत मांडले की प्रत्येक क्षणी जग हे अपडेट होत आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला अपडेट होऊन स्किल आत्मसात करणे गरजेचे आहे परमेश्वराने आई-वडिलांच्या मार्फत ज्या क्षमता दिल्या त्याचे प्रकटीकरण म्हणजे सबलीकरण होय जी संधी आहे ती घेणे व कार्य करणे म्हणजे सबलीकरण संधी पकडण्याची डेव्हलप करण्याची क्षमता म्हणजे सबलीकरण होय तसेच जीवन जगत असताना लहान लहान प्रसंगातून आपण समुपदेशनाकडे कसे वाढतो यासाठी त्यांनी दोन उदाहरणे दिली.
समुपदेशन म्हणजे संभाषणाची मालिका होय असे त्यांनी मांडले त्यांच्यानुसार मुलींमध्ये अनावधानाने भीती निर्माण होते आई-वडिलांच्या भांडणांचा मुलींच्या मनावर खोल परिणाम होतो शाळेत मुली त्या भांडणांचे ओझे घेऊन जगताना दिसतात यातूनच त्यांना समुपदेशनाची नितांत गरज भासते यासाठी सरांनी चार आयाम सांगितले.1. आय एम ओके यू आर नॉट ओके .2 आय एम नॉट ओके यु आर ओके .3 आय एम नॉट ओके यु आर नॉट ओके .4आय एम ओके अल्सो यू आर ओके यानुसार प्रत्येक व्यक्ती जीवन जगत या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात डॉक्टर जी जी कोल्हे यांनी भूषविले त्यांनी देखील पाचही दिवसाचा सविस्तर इतिवृत्त सांगून महिलांना सबलीकरण त्याचबरोबर मिशन ६सी अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या पाच दिवसीय कार्यक्रमा नुसार मार्गदर्शन केले त्यांनी देखील असे मत मांडले की महिला ह्या घराचा कणा असतो महिलांवरच समाज अवलंबून असतो म्हणून मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले योगदान दिले पाहिजे तसेच महाविद्यालयात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधला पाहिजे असे मत मांडले . आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा परदेशी या विद्यार्थिनीने केले व आभार छाया शिरसाळे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जी जी कोल्हे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. राजश्री नेमाडे डॉ. सविता वाघमारे डॉ. जयश्री पाटील डॉ. सीमा बारी. डॉ. पल्लवी भंगाळे प्रा.नाहीदा कुरेशी प्रा. शुभांगी पाटील प्रा.पुर्वी ससांने प्रा.प्राजक्ता कचकूटे प्रा.धिरज खेरे यांनी सहकार्य केले महाविद्यालयातील 80 पेक्षा जास्त विद्यार्थीनीनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.